एक्स्प्लोर
Fifa World Cup 2018 : चाहत्यांच्या जल्लोषाने मेक्सिकोत कृत्रिम भूकंप
Fifa World Cup 2018 : दरम्यान, ओपनिंग मॅचमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची 1982 नंतर ही पहिलीच वेळ आहे.
मेक्सिको सिटी : फिफा विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने डिफेन्डिंग चॅम्पियन जर्मनीचा 1-0 असा पराभव केला. आपल्या संघाच्या या विजयामुळे मेक्सिकोचे चाहते एवढे बेभान होऊन नाचले की देशात कृत्रिम भूकंप आला. भूकंपाची तपास करणाऱ्या यंत्रावर याची नोंद करण्यात आली. मेक्सिकोच्या संघाने गोल करताच चाहते नाचायला लागले आणि या यंत्रावर हादरे जाणवले.
चाहते मेक्सिको सिटीमधील प्रसिद्ध एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्स स्मारकाजवळ जमा झाले आणि देशाचे झंडे फडकावत गाणं गात होते. स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने 35व्या मिनिटात गोल करताच, चाहते आनंदाने 'आम्ही करुन दाखवलं', असं ओरडू लागले, नाचू लागले. मेक्सिकोच्या भूगर्भीय आणि वातावरणीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी जेव्हा लोजानोने जर्मनीविरुद्ध गोल केला तेव्हा एक मोठा हादरा जाणवला.
एंजल ऑफ इंडिपेन्डेंट्सजवळ उपस्थित चाहते आनंदाने 'मेक्सिको, मेक्सिको, मेक्सिको'च्या घोषणा देत होते. आमचा संघ आता इतर 15 संघांसह पुढच्या राऊंटमध्ये पोहोचली, असा चाहत्यांना विश्वास आहे. मेक्सिकोचा संघा उपांत्यपूर्वी, उपांत्य किंवा अंतिम सामन्यातही पोहोचेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी गोलकीपर गुलिमेरो ओचाओच्या कामगिरीची प्रचंड कौतुक केलं. दरम्यान, ओपनिंग मॅचमध्ये पराभूत होण्याची जर्मनीची 1982 नंतर ही पहिलीच वेळ आहे.El #sismo detectado en la Ciudad de México se originó de manera artificial. Posiblemente por saltos masivos durante el Gol de la selección de #México en el mundial. Por lo menos dos sensores dentro de la Ciudad lo detectaron a las 11:32. pic.twitter.com/mACKesab3b
— SIMMSA (@SIMMSAmex) June 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement