एक्स्प्लोर

#HappyBirthdaySachin | आज मास्टर ब्लास्टरचा वाढदिवस... सचिनबाबतच्या 'या' गोष्टी जाणून घ्याच

आज मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार नसल्याचं त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लॉस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला वयाची 46 वर्ष पूर्ण केली. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाला कुठलंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यंदा देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती सचिनच्या जवळच्या मित्राने दिली आहे. 'ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे, अशी माहिती सचिनच्या मित्राने दिली. सचिनबाबतच्या महत्वाच्या गोष्टी
  • क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचं नाव प्रसिध्द संगीतकार सचिन देव म्हणजे एसडी बर्मन यांच्या नावावरुन ठेवलं गेलं. सचिनचे वडील रमेश तेंडूलकर एसडी बर्मन यांचे फॅन होते.
  • 16 वर्षाच्या वयात सचिननं पाकिस्तानविरुद्ध 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात वकार यूनुसच्या चेंडूवर सचिनच्या नाकाला दुखापत झाली होती.
  • सचिन तेंडूलकर जगात 100 शतक ठोकणारा एकमेव खेळाडू आहे. सोबतच कसोटी, वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.
  • सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.
  • सचिननं 463 एकदिवसीय तर 200 कसोटी सामने खेळले आहेत.
  • सर्वाधिक 62 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे.
  • विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (2,278) करण्याचा विक्रम त्याच्याच नावे आहे.
  • सचिन नेहमी आपले गुरु रमाकांत आचरेकर यांचं आभार मानताना दिसतो. त्यांनीच सचिनला क्रिकेटचे धडे दिले.
  • सचिन- ए बिलियन ड्रीम्स नावाचा एक चित्रपट त्याच्या जीवनावर आधारीत आहे. यात सचिन स्वत: आपली जीवनकथा सांगताना दिसला होता.
लॉकडाऊनमध्ये सचिनच्या हातात बॅट नाही तर कात्री! कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यावेळी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वास त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला होता. ABP EXCLUSIVE | देशासाठी शक्य ते सर्व करू; सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीची पंतप्रधानांना ग्वाही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घरात बसून आहेत. या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामेही खोळंबली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच सचिनने कात्री घेत स्वतःचेच केस कापले असल्याचे मजेशीर फोटो आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget