ABP EXCLUSIVE | देशासाठी शक्य ते सर्व करू; सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीची पंतप्रधानांना ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉलवर क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि 49 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्याव्यरिक्त महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, माजी गोलंदाज जहीर खान, युवराज सिंह आणि केएल राहुल यांचाही समावेश होता.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या विरोधात लढाई लढण्यासाठी संपूर्ण देश सज्ज आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही खेळाडूंशी व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकर, सौरब गांगुली, विराट कोहलीसह देशातील दिग्गज खेळाडूंशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे ओपनिंग बॅट्समन जोडी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वार पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना सचिन तेंडुलकरने सांगितले की, 'भारतीय संघासाठी मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो आणि पंतप्रधान मोदींनीदेखील मला चौथ्या क्रमांकावरच बोलण्याची संधी दिली. त्यांनी सांगितलं की, 'आज पंतप्रधान मोदींशी बोलताना माझी बँटिंग ऑर्डर चार होती. कोरोना व्हायरसविरोधात मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. मी भारतीय संघासाठीही चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करत होतो.'
पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदींचा देशातील 40 खेळाडूंशी संवाद
मदतीचं दिलं आश्वासन
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधल्याबाबत आनंद व्यक्त केला. सौरव गांगुलीने पंतप्रधान मोदींना सांगितलं की, 'कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये संपूर्ण देशभरातील पोलीस उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि आपण या लढाईत नक्कीच विजय मिळवू.' सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं की, लॉकडाऊनंतरही लोकांनी कोरोना व्हायरसला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉलवर क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि 49 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्याव्यरिक्त महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, माजी गोलंदाज जहीर खान, युवराज सिंह आणि केएल राहुल यांचाही समावेश होता.
संबंधित बातम्या :
Wimbledon | यंदा विम्बल्डनचं आयोजन नाही, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच स्पर्धा रद्द
Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार