एक्स्प्लोर
Advertisement
लॉकडाऊनमध्ये सचिनच्या हातात बॅट नाही तर कात्री!
नेहमीच बॅट हातात असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हातात चाहत्यांना पहिल्यांदाच कात्री दिसली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. या काळात सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घरात बसून आहेत. या लॉकडाऊनमुळे दैनदिन कामेही खोळंबली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. सचिनच्या हातात नेहमी आपण बॅट पाहिली आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात त्याने कात्री घेत स्वतःचेच केस कापले आहेत. याचे मजेशीर फोटो सचिनने आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सचिन तेंडुलकरच्या हातात बॅट पाहणे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकतेच मुंबईत एका चॅरिटीसाठी सचिन क्रिकेटच्या मैदानात दिसला होता. याव्यतिरिक्त सचिन एफवन रेसिंग स्पर्धेतही भाग घेताना दिसला आहे. मात्र, सचिनच्या हातात कात्री पाहण्याचा योग अद्याप तरी त्याच्या चाहत्यांना आला नसावा. केस कापतानाचे सर्व फोटो सचिनने आपल्या इंस्टावर पोस्ट केले आहेत. आयपीएलसह अनेक क्रिकेटच्या मॅच पुढे ढकलल्याने सर्वच खेळाडू आपापल्या घरात बंदिस्त आहेत. खेळाची मैदान आणि बॉलिवूडचे काम सर्वच बंद असल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली-अनुष्का शर्मा ही जोडीही लॉकऊनच्या दरम्यान घरातच आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनीही असाच केस कापतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
मात्र, विराटचे केस त्याने न कापता अनुष्काने कापले आहेत. कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झाला असला अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडिओत विराट एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. विराटच्या हेअर स्टाइलसाठी सर्व मेहनतही खुद्द अनुष्काने घेतल्याचे दिसते. यापूर्वी अनुष्का-विराट जोडीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद द्या, असे आवाहन चाहत्यांना केले होते. त्या व्हिडिओला देखील चांगली पंसती मिळाली होती. Nashik PPE Kit | नाशिकमध्ये तरुण उद्योजकाकडून दिवसाला 2 हजार पीपीई किटची निर्मितीView this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
शिक्षण
Advertisement