Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (District Cricket Association) तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Board) संघात निवड झाली आहे.
![Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड maharashtra news nashik news Selection of three women cricketer from Nashik in Maharashtra Cricket Team Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/7f6864140a6979684a73150d56cbe166166512778043389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (District Cricket Association) रसिका शिंदे, माया सोनवणे (Maya Sonwane) व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Board) संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी या तिघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुणे (Pune) येथे संभाव्य खेळाडूतील चाचणी स्पर्धा सामन्यांत झालेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ही निवड आली आहे. तसेच यापूर्वीच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील या खेळाडूंची लक्षणीय कामगिरी देखील विचारात घेण्यात आली. माया सोनवणेची, गेल्या हंगामाच्या सुरुवातीसच भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार्या संभाव्य 35 खेळाडुं मध्ये निवड झाली होती. नाशिकची महिला क्रिकेटपटू मायाची प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली होती. माया ही उत्तम फिरकीपटू असून ऑक्टोबर 2021 अखेर डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत माया ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्या स्पर्धेत मायाने 5 सामन्यात 21 षटकांत केवळ 3.33 च्या सरसरीने 70 धावा देऊन 4 गडी बाद केले. चार षटकांत 12 धावांत 3 बळी अशी तिची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी होती.
जलदगती गोलंदाज व उत्कुष्ट फलंदाज रसिका शिंदेने यापूर्वी महाराष्ट्रातर्फे एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुरत येथेच महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 दरम्यान 19 वर्षांखालील राज्यस्तरीय महिलांसाठी 50 षटकांची एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतही रसिका खेळली होती. 2017 सालापासूनच आंतर शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केल्यापासुन विविध वयोगटात रसिका महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे भावना गवळी या प्रशिक्षकामार्फत मुलींसाठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.
प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, नोव्हेंबर 2019 मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतांना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. 2018-19 च्या हंगामात ,टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकाविली आहेत. पुदुचेरी येथे 2019 साली झालेल्या तेवीस वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने सिक्किम वर 108 धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्यात प्रियांका घोडके च्या ५९ चेंडूतील दमदार ६१ धावांचा मोठा वाटा होता. प्रियांका ने देखील 19 व 23 वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.
असे आहे सामन्यांचे वेळापत्रक
सुरत येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत - 11 ऑक्टोबर - दिल्ली, 14 ऑक्टोबर - कर्नाटक, 16 ऑक्टोबर - हरयाणा. 18 ऑक्टोबर – माणिपूर, 20 ऑक्टोबर-हिमाचल प्रदेश, 22 ऑक्टोबर- आसाम येथे सामन्यांचे नियोजजन असणार आहे. या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)