एक्स्प्लोर
IndvsPak Final CT 2017: फायनल कुठे, कधी, कशी पाहता येईल?

लंडन: भारत की पाकिस्तान कोण होणार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स? विराट कोहलीची टीम इंडिया की, सरफराज अहमदची पाकिस्तान टीम, या प्रश्नाचं उत्तर रविवारी मिळणार आहे. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आयसीसी इव्हेण्टच्या सर्वोच्च व्यासपीठावर दोन सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण असो वा विश्वचषकाचं महायुद्ध, एरवी भारत-पाकिस्तानचा सामना आला की, चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार किंवा विश्वचषक कोण जिंकणार हा प्रतिष्ठेचा प्रश्न साईडट्रॅक होतो आणि ऐरणीवर येतो तो अस्मितेचा मुद्दा. भारतीय पाठीराखे म्हणतात.. आधी पाकिस्तानला हरवा, विजेतेपदाचं नंतर बघू. तर पाकिस्तानी समर्थक म्हणतात आधी भारताला हरवा, विजेतेपद नाही मिळालं तरी चालेल. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्तानं क्रिकेटिंग प्रतिष्ठेचा आणि भारत-पाकिस्तान अस्मितेचा मुद्दा एक झाला आहे. हा महामुकाबला रविवारी पाहायला मिळेल. भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कधी खेळवण्यात येईल? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल रविवारी 18 जूनला खेळवण्यात येईल. भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कुठे खेळवण्यात येईल? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल रविवारी 18 जूनला लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल. भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल कुठे पाहायला मिळेल? भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामना स्टार स्पोर्स्ट 1, स्टार स्पोर्स्ट HD 1, स्टार स्पोर्स्ट 1 हिंदी, स्टार स्पोर्स्ट 1 HD हिंदी आणि DD नॅशनल अर्थात दूरदर्शनवर लाईव्ह मॅच पाहता येईल. याशिवाय हॉट स्टार या मोबाईल अॅपवरही लाईव्ह मॅच पाहता येईल. भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल मॅच किती वाजता सुरु होईल? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल लंडनच्या वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता, तर भारतात दुपारी 3 पासून पाहायला मिळेल. भारत आणि पाकिस्तान यांची चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल ऑनलाईन कुठे पाहता येईल? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल हॉटस्टार या मोबाईल अॅपवर पाहता येईल. तसंच लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषणासाठी www.abpmajha.in वर लॉग ऑन करा. संबंधित बातम्या भारत की पाकिस्तान, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कोण? महामुकाबल्यात 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती?
आणखी वाचा























