एक्स्प्लोर
कोटीफ कप : भारताच्या अंडर-20 संघाची अर्जेंटिनावर मात
कोटीफ कपमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भारतीय संघानं व्हेनेझुएलाला गोलशून्य बरोबरीत रोखलं होतं.
व्हॅलेन्सिया (स्पेन) : भारताच्या अंडर ट्वेन्टी संघानं बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करून कोटीफ कप फुटबॉल स्पर्धेत एका शानदार कामगिरीची नोंद केली. स्पेनमधल्या व्हॅलेन्सिया येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या सामन्यात भारतीय संघावर दहा खेळाडूंनी खेळण्याची वेळ आली होती. पण त्या परिस्थितीतही भारतीय संघानं अर्जेंटिनावर 2-1 असा अविस्मरणीय विजय साजरा केला.
भारताकडून दीपक तांगरीनं चौथ्या मिनिटाला आणि अन्वर अलीनं 68 व्या मिनिटाला एकेका गोलची नोंद केली. भारताच्या या अंडर ट्वेन्टी संघाला फ्लॉईड पिंटो यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
कोटीफ कपमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भारतीय संघानं व्हेनेझुएलाला गोलशून्य बरोबरीत रोखलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement