एक्स्प्लोर

IND vs ENG T20 World Cup Semi Final : वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?

IND vs ENG T20 World Cup Semi Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे.

Wankhede Pitch IND vs ENG T20 World Cup Semi Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी या टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली असून आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोघेही पूर्ण ताकदीने उतरतील. टीम इंडियाने मुंबईत जोरदार सराव केला. याच सरावादरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पिच क्युरेटरशी गंभीर चर्चेत गुंतलेले दिसले. त्या चर्चेतील त्यांचे हावभाव पाहून ते थोडे नाराज किंवा चिंताग्रस्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. संबंधित फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

जुनीच खेळपट्टी...

रिपोर्टनुसार, भारत विरुद्ध यूएसए सामन्यात वापरण्यात आलेलीच पिच या सेमीफायनलसाठी वापरली जाणार आहे. त्या सामन्यात धावा काढताना भारतीय फलंदाजांना मोठी कसरत करावी लागली होती आणि सामना कमी धावसंख्येचा ठरला होता. त्यामुळे या वेळी पिचचा स्वभाव कसा असेल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाहता पिच कडक आणि उसळी देणारी वाटत असली तरी गंभीर यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

मात्र, येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पिचची जबाबदारी स्थानिक क्युरेटरकडे नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे असते. त्यामुळे जर गंभीर काही मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत असतील, तर त्यात वानखेड़ेच्या स्थानिक क्युरेटरची थेट भूमिका नसण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, रात्रीच्या सरावावेळी भारतीय खेळाडू लाईट्सखाली फिल्डिंग ड्रिल करत असताना क्युरेटर शांतपणे 22 यार्डांची पिच कव्हर करताना दिसले. या सगळ्या घडामोडींमुळे सामन्यापूर्वीच वातावरण तापले आहे.

टी-20 विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी

टी-20 विश्वचषकात भारताचा प्रवास दमदार राहिला आहे. गट टप्प्यात भारत अपराजित राहिला. प्रथम यूएसएवर विजय, त्यानंतर नामिबियावर मात, आणि शेवटच्या दोन लीग सामन्यांत पाकिस्तान व नेदरलँड्सचा पराभव करत भारताने सुपर-8 मध्ये प्रवेश केला. सुपर-8च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, पण त्यानंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. आता सगळ्यांचे लक्ष 5 मार्चकडे लागले आहे, वानखेडेवर कोणता संघ दबदबा निर्माण करणार? पिचचा स्वभाव काय रंग दाखवणार? आणि गंभीर यांच्या चर्चेचा नेमका अर्थ काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे मैदानावरच मिळणार आहेत.

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Semifinal: कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्यवाणी खरी ठरली!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya And Gf Mahika Sharma Video: खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget