एक्स्प्लोर

IND vs ENG T20 World Cup Semi Final : सलग 5 विजय, इंग्लिश कॅप्टनने ओलांडली सीमा; टीम इंडियाला दिलं खुलं चॅलेंज, म्हणाला...

IND vs ENG T20 World Cup Semi Final : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात सलग पाच विजय मिळवल्यानंतर प्रचंड आत्मविश्वासात आहे.

IND vs ENG T20 World Cup Semi Final : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात सलग पाच विजय मिळवल्यानंतर प्रचंड आत्मविश्वासात आहे. भारताविरुद्धच्या हायव्होल्टेज उपांत्य फेरीच्या एक दिवस आधी त्याने सूचक शब्दांत स्पष्ट केले. “आम्ही कधीच खेळातून बाहेर नसतो. दबाव टोकाला पोहोचला की आमचा खेळ अधिक उंचावतो.”

इंग्लंडने गट टप्प्यात नेपाळ, स्कॉटलंड आणि इटली यांच्यावर दणदणीत विजय मिळवत पुढची फेरी गाठली. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. तरीही सुपर-8 फेरीत ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध अपराजित राहून उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला.

“हीच चांगल्या संघाची ओळख....”

स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी बोलताना ब्रूक म्हणाला, “आम्ही सामने जिंकतो आहोत, ही चांगल्या संघाची खूण आहे. मी एक गोष्ट शिकलो आहे, सामना संपेपर्यंत आपण कधीच बाहेर नसतो. माझ्याकडे प्रचंड कॅरेक्टर असलेले खेळाडू आहेत. ते जिंकण्याची तीव्र इच्छा बाळगतात आणि दबावातही शांत राहतात." त्याच्या मते, याच आत्मविश्वासामुळे इंग्लंड यजमान भारताविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अधिक मजबूत ठरतो. इंग्लंडच्या आक्रमक विचारसरणीवर भर देताना तो म्हणाला, “मी नेहमी फलंदाजांसाठी शक्य तितकं कठीण वातावरण निर्माण करू इच्छितो.”

टॉप ऑर्डरला ठाम पाठिंबा...

व्हाईट-बॉल क्रिकेटमधील दिग्गज जोस बटलर याचा अपेक्षित फॉर्म नसतानाही आणि फिल सॉल्ट सातत्य राखू न शकल्यानेही ब्रूकने आपल्या टॉप ऑर्डरला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, “जोसला एकटं सोडायला हवं. तो या खेळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जातो. मला खात्री आहे, तो मोठी खेळी करेल. आमच्या टॉप-7 मध्ये इतके दमदार खेळाडू आहेत की एखादा अपयशी ठरला तरी विरोधी संघ गोंधळून जाईल.”

विल जॅक्सचे कौतुक, सेमीफायनलवर नजर...

ऑलराउंडर विल जॅक्स याचंही ब्रूकने विशेष कौतुक केलं. “त्याचा हा पहिलाच मोठा विश्वचषक आहे, पण त्याने आपली भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली. त्याने दाखवलेला कॅरेक्टर अप्रतिम आहे,” असे तो म्हणाला. उपांत्य फेरीबाबत ब्रूकने शेवटी स्पष्ट केले, “हा सामना जबरदस्त होणार आहे. दोन्ही संघांसाठी प्रचंड दबावाचा आणि मोठ्या संधीचा क्षण आहे.” आता भारताविरुद्ध इंग्लंडचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने कसोटीला लागणार आहे.

हे ही वाचा -

Pakistan Cricket News : टी-20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; बाबर-शादाबला विरोध करणारा सेलेक्टर निवड समितीतून OUT, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Embed widget