Kabaddi : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत जानेवारीत कबड्डी स्पर्धेचा थरार, बारामतीत होणार आयोजन
Kabaddi Sports : बारामती येथे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे.
Kabaddi tournament at Baramati : महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असणाऱ्या कबड्डीची (Kabaddi) एक भव्य अशी स्पर्धा यंदा वर्षाच्या सुरुवातीला पार पडणार आहे. या स्पर्धेचा थरार पुणे जिल्ह्यातील बारामती येथे रंगणार आहे. राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, 'महाराष्ट्र राज्य कबड्डी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे (Sports tournament) आयोजन ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून (Maharshtra State) खेळाडू सहभागी होणार असून त्यांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यभरातून क्रीडा ज्योत मशाल पुणे शहरात (Pune City) एकत्र आणण्यात येणार असून त्यांनतर त्या सर्व क्रीडा ज्योत एकत्रितपणे पुणे येथून शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे नेण्यात येतील. पुणे विभागातील क्रीडा ज्योत बारामतीहून पुणे येथे येणार आहे.'' दरम्यान या क्रीडा ज्योत रॅलीच्या अनुषंगाने व्यवस्था करावी. मार्गावरील शाळेतील खेळाडूंना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. या क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही देशमुख यांनी यावेळी दिल्या.
दमदार खेळाडू होणार सहभागी
या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नामंवत खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन यावे. स्पर्धेच्या निमित्ताने बारामती शहरातील नागरिकांना राज्यातील नामवंत खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने स्थानिक शाळांना सहभागी करून घ्यावे असे यावेळी देशमुख यांनी सांगितले. या स्पर्धेत राज्यातील पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 8 वरिष्ठ संघ सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं. खेळाडूंसोबत संघव्यवस्थापक, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक असे जवळपास 300 जण या निमित्ताने स्पर्धांमध्ये सामिल होतील अशी माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा-