Ajit Pawar on Kabaddi : कबड्डी खेळासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे : अजित पवार
राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीसह कार्यकारणी समिती सभा नुकतीच पार पडली यावेळी बोलताना अजित यांनी कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवायला हवी असं वक्तव्य केलं.
Kabaddi Game : महाराष्ट्राच्या (Maharashtra) मातीतला खेळ असणाऱ्या कबड्डीला (Kabaddi) मागील काही वर्षात अच्छे दिन आले आहेत. प्रो कबड्डी लीगसारख्या(Pro Kabaddi) स्पर्धांमुळे कबड्डी अगदी नॅशनल तसंच इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचली आहे. अशामध्ये आता राज्यातही कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि युवा कबड्डीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न कराया हवेत, असं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. राज्य कबड्डी असोसिएशनसह सर्वांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या पुरुष संघाची कामगिरी उंचावली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवायला हव्या असंही पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीची सभा तसेच कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे तसेत इतर सदस्यही उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करावे, त्यासाठी कबड्डीच्या प्रशिक्षकांना दर्जेदार आणि आधुनिक प्रशिक्षण द्यावे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी विविध उपाययोजना करायला हवं असंही पवार म्हणाले.
या कार्यकारणीच्या सभेत विविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जिल्हानिहाय राज्य संघटनेचे अभिनव उपक्रम राबविण्यासाठी धोरण निश्चिती, जिल्हा संघटनांच्या कामकाजात सूसुत्रता आणणे, राज्य संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे, विविध गटातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, खेळाडू निवड प्रक्रीयासंबंधी धोरण निश्चिती करणे, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील खेळाडूंना दर्जेदार साहित्य पुरविणे यांसह इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
7 ऑक्टोबरपासून रंगणार प्रो कबड्डी
भारतात अल्पकाळात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कबड्डी प्रो लीगच्या नवव्या हंगामाला (Pro Kabaddi League Season 9) येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या हंगामात प्रेक्षकांनाही सामना पाहण्यासाठी मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं याबाबात घोषणा केलीय. या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती. या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया 5, 6 ऑगस्ट 2022 ला पार पडली होती.
हे देखील वाचा-