एक्स्प्लोर

राजस्थानचा ‘रॉयल’ शिलेदार - जॉस बटलर

आयपीएल प्ले ऑफच्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचं आव्हान जिवंत ठेवणारा इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉस बटलर आयपीएलच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे.

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात राजस्थानच्या रॉयल्ससाठी पैसा वसूल कामगिरी बजावली ती एकट्या जॉस बटलरनं. राजस्थाननं खरं तर कोटीच्या कोटी उड्डाणं करुन बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट आणि संजू सॅमसनला विकत घेतलं होतं. त्या तिघांच्या तुलनेत राजस्थाननं जॉस बटलरला अगदी स्वस्तात खरेदी केलं होतं. आयपीएलच्या रणांगणात त्याच बटलरनं राजस्थानसाठी उजवी कामगिरी बजावली. आयपीएलच्या रणांगणात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सनं प्ले ऑफची पहिली दोन तिकीटं आधीच बुक केली आहेत. पण प्ले ऑफच्या अखेरच्या दोन तिकीटांसाठी कोलकाता, मुंबई, बंगळुरु, राजस्थान आणि पंजाब संघांत अजूनही चुरस आहे. आयपीएल प्ले ऑफच्या या शर्यतीत राजस्थान रॉयल्सचं आव्हान जिवंत ठेवणाऱ्या शिलेदाराचं नाव आहे जॉस बटलर. इंग्लंडचा हा यष्टिरक्षक-फलंदाज यंदाच्या आयपीएल मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे. जॉस बटलरनं यंदाच्या आयपीएल मोसमात सलग पाच अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. मागच्या सहा सामन्यांमध्ये त्यानं दिल्लीविरुद्ध 67 धावा, पंजाबविरुद्ध 51 आणि 82 धावा, चेन्नईविरुद्ध नाबाद 95, मुंबईविरुद्ध नाबाद 94 आणि कोलकात्याविरुद्ध 39 धावा अशी कामगिरी बजावली आहे. बटलरच्या याच कामगिरीनं राजस्थानला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवलं आहे.
बटलर जेव्हा मुंबईसाठी उघडा होऊन नाचला होता...
राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधला अजूनही एक साखळी सामना शिल्लक आहे. पण जॉस बटलरनं यंदाच्या मोसमात तेरा सामन्यांमध्ये 155.24 च्या स्ट्राईक रेटनं 548 धावांचा रतीब घातला आहे. त्याच्या या कामगिराला पाच अर्धशतकांसह 52 चौकार आणि 21 षटकारांचा साज आहे. बटलरनं फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणाची दुहेरी जबाबदारीही समर्थपणे सांभाळली आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला साडेबारा कोटी, जयदेव उनाडकटला साडेअकरा कोटी आणि संजू सॅमसनला आठ कोटींची भली मोठी बोली लावून खरेदी केलं होतं. पण त्या तिघांपैकी एकालाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण त्या तिघांच्या तुलनेत अगदीच स्वस्तात म्हणजे अवघी 4 कोटी 40 लाखांची बोली लागलेल्या बटलरनं मात्र राजस्थान रॉयल्ससाठी पैसा वसूल कामगिरी बजावली आहे.
बटलरच्या नाबाद 94 धावा, राजस्थानचा मुंबईवर मोठा विजय
बटलरच्या आयपीएलमधल्या कामगिरीची दखल इंग्लंड क्रिकेट बोर्डालाही घ्यावी लागली आहे. 24 मेपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. तीही तब्बल 16 महिन्यांच्या कालावधीनंतर. लॉर्ड्स कसोटीत खेळण्यासाठी जॉस बटलर लवकरच इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडच्या आजच्या जमान्यातल्या गुणवान फलंदाजांपैकी एक अशी बटलरची ओळख आहे. हा गुणवान फलंदाज त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असताना इंग्लंडला हवाहवासा वाटणं स्वाभाविकच होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget