एक्स्प्लोर

James Anderson : जेम्स अॅंडरसनचा विश्वविक्रम, कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज, कुंबळेचाही विक्रम मोडला

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा (Anil Kumble) विक्रम मोडीत काढला आहे.

INDvsENG 1st Test : इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहम (Nottingham)मध्ये सुरु असलेल्या (india vs england 1st test live)पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा (Anil Kumble) विक्रम मोडीत काढला आहे. कसोटीत 620 विकेट्स घेत त्यानं कसोटीत सर्वाधित विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याने अनिल कुंबळेच्या 619 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. 

डरसनच्या नावावर आता 162 कसोटी सामन्यात 620 विकेट्सची नोंद झाली आहे. अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी 619 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सश्रीलंकन मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत. मुरलीधरनने 133 सामन्यात 800 कसोटी विकेट्सची नोंद केली आहेत. त्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचा क्रमांक लागतो. वॉर्नने 145 सामन्यात दुसऱ्या सर्वाधिक 708 विकेट्स घेतल्या आहेत. 

अँडरसन हा जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज देखील ठरला आहे.  अँडरसनपूर्वी ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅकग्रानं टेस्ट क्रिकेटमध्ये 563 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 
 
 टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज 
इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या (india vs england 1st test live)पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी 157 धावांची गरज आहे. टीम इंडियाकडे 9 विकेट्स शिल्लक असून केएल राहुल मात्र काल चौथ्या दिवशी बाद झाला. नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आला.  भारताने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 52 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात चांगली खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले.  चौथ्या दिवसअखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर खेळत आहेत. अद्याप टीम इंडियाला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.

दुसऱ्या डावात कर्णधार रुटचे शानदार शतक
इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 25 धावांवरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव चौथ्या दिवशी 303 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रुटने 109 धावा केल्या. जो रुटला  जॉनी बेअरस्टोने 30 आणि त्यानंतर सॅम करनने 32 धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.  
 
पहिल्या डावात लोकेश राहुलची चांगली खेळी 
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावा केल्या.  त्यामुळं भारताचा पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84, जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स घेतल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : जबरदस्त भाषणानंतर अजितदादांची पत्रकार परिषद, पाहा नेमकं काय म्हणाले ?Amit Shah Full Speech : 370 वेळी केलेल्या भाषणाची पुनरावृत्ती! वक्फ प्रकरणावर शाहांचं स्फोटक भाषणAkhilesh Yadav Vs Amit Shah : वक्फ कायद्यावरील चर्चेदरम्यान अखिलेश यादव-अमित शाह जुगलबंदीSanjay Raut Full Speech :  चुटकी वाजत म्हणाले, ए कोण बोललं बाळासाहेब?राऊत राज्यसभेत भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vsGT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget