एक्स्प्लोर
आयपीएलचा 12 वा मोसम यूएईमध्ये?
2009 साली भारतात आयपीएलचा दुसरा मोसम होता. त्याचवर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे सामने खेळवले गेले होते.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 12 वा मोसम यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण पुढील वर्षी भारतात लोकसभा निवडणुका असतील, त्यामुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा 12 वा मोसम एप्रिलच्या पहिल्या आठवड्याऐवजी 23 मार्चपासून 19 मे पर्यंत सुरु राहील. लोढा समितीच्या शिफारशींनुसार कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांआधी 15 दिवसांच्या अवधीचं अंतर ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे एप्रिलऐवजी मार्चपासूनच आयपीएलचा पुढील मोसम सुरु केला जाण्याची शक्यता आहे.
तारखा बदलण्यासोबतच आयपीएल खेळवण्याचं ठिकाणही पुढील वर्षी बदलण्याची शक्यता वाढली आहे. कारण पुढील वर्षी म्हणजे 2019 साली भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भारताऐवजी यूएईमध्ये आयपीएलचा 12 वा मोसम खेळवला जाण्याची शक्यता आहे.
2009 साली भारतात आयपीएलचा दुसरा मोसम होता. त्याचवर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे सामने खेळवले गेले होते. 2014 साली आयपीएलचे निम्मे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. आयपीएलचा हा इतिहास पाहता, 2019 सालचा मोसम यूएईमध्ये खेळवला जाण्याची शक्यता अधिक आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “भारतात काही अडचणी आल्यास इतर ठिकाणी सामने खेळवण्यास आम्ही कुठल्याही स्थितीत तयार आहोत. अगदीच गरज भासल्यास यूएईमध्ये सामने खेळवले जाऊ शकतात. कारण यूएईचा वेळ भारतीय प्रेक्षकांसाठी अनुकूल आहे.”
यूएईमध्ये शारजा, दुबई आणि अबुधाबी अशा तीन ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळवले जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बीड
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement