एक्स्प्लोर

IPL Security Breach: आयपीएलच्या सुरक्षेत मोठी चूक, चाहता थेट मैदानात, विराट कोहलीला नमस्कार करुन कडकडून मिठी

IPL Security Breach : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात मॅच पार पडली. या मॅचमध्ये विराटनं 77 धावा केल्या, यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला.

बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल सहावी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात पार पडली. आरसीबीनं या मॅचमध्ये पंजाबवर चार विकेटनं विजय मिळवला. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहलीनं 49 बॉलमध्ये  77 धावा केल्या होत्या. मात्र, यामॅचमध्ये आयपीएलच्या सुरक्षा व्यवस्थेवर (IPl Security Breach) प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. 

पंजाब किंग्जनं आरसीबीला 177 धावांचं टार्गेट दिलं होतं. आरसीबीनं 6 विकेट गमावत मॅच जिंकली. विराट कोहली ज्यावेळी बॅटिंग करत होता. त्यावेळी सुरक्षेत एक चूक झाली. एक चाहता आयपीएलची सुरक्षा भेदून अचानक मैदानात घुसला. तो धावत धावत विराट कोहलीच्या जवळ गेला. संबंधित चाहत्यानं विराट कोहलीचे पाय धरले. चाहत्याच्या मागं सुरक्षा दलाचा जवान देखील धावत सुटला. एका जवानांन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं विराट कोहलीला पकडण्याचा प्रयत्न केला.या सर्व प्रकारानंतर दुसरा सिक्युरिटी गार्ड आला आणि दोघांनी त्याला मैदानाबाहेर नेलं.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सुरक्षा भेदून चाहता थेट विराट कोहलीजवळ पोहोचला. या सर्व प्रकारानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चाहत्यांनी सुरक्षा भेदण्याची ही आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली घटना नाही. 

जानेवारीत ही अशीच घटना

जानेवारी  2024 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये अशीच घटना घडली होती. त्यावेळी चाहत्यानं सुरक्षा भेदून मैदानात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यानं विराट कोहलीला मिठी मारली होती. त्यावेळी विराट कोहली फिल्डिंग करत होता. त्या मालिकेत विराट कोहली 14 महिन्यानंतर टी 20 मध्ये पुनरागमन करत होता. 

आरसीबीचा पहिला विजय

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला होता. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या मॅचमध्ये अखेर आरसीबीनं पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीनं पंजाब किंग्जला चार विकेटनं पराभूत केलं. आरसीबीनं प्रथम टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या होत्या. बंगळुरुनं विराट कोहलीच्या 77 आणि दिनेश कार्तिकच्या 28 धावांच्या जोरावर विजय मिळवला. 

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अखेर या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळाला आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आयपीएलच्या विजेतेपदाचा दुष्काळ यंदा तरी संपणार का हे पाहावं लागेल.     

संबंधित बातम्या : 

CSK Vs GT LIVE Score Updates, IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज अन् गुजरात टायटन्स आमने सामने, ऋतुराज गायकवाडसह शुभमन गिलची परीक्षा

CSK vs GT : ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन, चेन्नई की गुजरात कोण बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget