CSK vs GT : ऋतुराज अन् शुभमन आमने सामने; कशी असेल प्लेइंग इलेव्हन, चेन्नई की गुजरात कोण बाजी मारणार?
IPL : चेन्नईमध्ये चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचं वर्चस्व राहिलं आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी आरसीबीला पराभूत केलं होतं. आज चेन्नई आणि गुजरात आमने सामने येणार आहेत.
चेन्नई : आयपीएल (IPL 2024)मध्ये आज सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात होणार आहे. आजची मॅच चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉकवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले सामने जिंकले आहेत. चेन्नईनं आरसीबीचा 6 विकेटनं पराभव केला होता.तर, गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला होता. आज चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांची प्लेइंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि मॅच प्रेडिक्शन कसं असेल जाणून घेऊया.
पिच कसं असेल?
चेपॉक स्टेडियमवरील पिच संदर्भात बोलायचं झाल्यास इथली विकेट स्लो असते. इथं बॉल सहजपणे बॅटवर येत नाहीत. स्पिन गोलंदाज विरोधी बॅटसमनपुढं आव्हान निर्माण करतात. याशिवाय वेगवान बॉलर्सला देखील इथं मदत मिळते. मात्र, एखाद्या बॅटसमननं अंदाज घेतल्यास तो यशस्वीपणे बॅटींग करु शकतो. या मैदानावर पहिल्यांदा बॅटींग करणारी टीम 46 वेळा जिंकली आहे. तर, दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीम 31 वेळा जिंकली आहे. चेपॉकवर पहिल्यांदा बॅटींगचा सरासरी स्कोअर 163 धावा इतका आहे.
चेन्नईचं पारडं जड?
चेन्नई सुपर किंग्जची बाजू चेपॉकवर नेहमी वरचढ राहिलेली आहे. चेपॉकच्या पिचवर सीएसकेचे स्पिनर्स विरोधी बॅटसमनला जम बसू देत नाहीत. आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीलाच चेन्नईनं आरसीबीला पराभवाचा धक्का दिला होता. आजच्या मॅचमध्ये चेन्नईची बाजू वरचढ ठरू शकते. गुजरात टायटन्सला चेन्नईचा पराभव करणं सोपं असणार नाही, असा अंदाज आहे.
गुजरात फायनलमधील पराभवाचा वचपा काढणार?
चेन्नई सुपर किंग्जनं 2023 च्या आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईनं गुजरातला पराभूत करत आयपीएलमधील पाचवं विजेतेपद पटकावलं होतं. आता गुजरात टायटन्स आजच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करुन गेल्या वर्षीच्या फायनलचा वचपा काढण्यात यशस्वी होईल का हे पाहावं लागेल. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत टॉपवर जाईल.
चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड (कप्तान),एम.एस.धोनी, रचिन रवींद्र,अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, दीपक चहर, महेश थीक्षाना, मुस्तफिजूर रहमान आणि तुषार देशपांडे.
गुजरातची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल (कप्तान),रिद्धिमान साहा, डेविड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेन्सर जॉनसन
संबंधित बातम्या :
IPL 2024 : आरसीबीचा पहिला विजय, पॉइंट टेबलमध्ये उलटफेर, टॉपला कोणती टीम, ऑरेंज कॅप कुणाकडे?