RCB vs SRH: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनील गावस्कर संतापले
IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे.
IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं 12 सामने खेळले असून 216 धावा केल्या आहेत. ज्यात एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर संताप व्यक्त केलाय. विराटनं आयपीएलमधून विश्रांती घेण्याची गरज आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान, विराट कोहली डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जगदीश सुचितनं त्याला झेलबाद केलं. यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. यावर सुनील गावस्कर म्हणाले की, “मला वाटतं गोष्ट अशी आहे की जर तुम्ही खेळला नाही तर तुमचा फॉर्म कसा परत येईल? चेंज रूममध्ये बसल्याने तुमचा फॉर्म परत मिळणार नाही. तुम्ही जितके जास्त खेळाल तितकी तुम्हाला तुमचा फॉर्म परत मिळण्याची शक्यता जास्त आहे.” उल्लेखनीय म्हणजे, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की विराट कोहली मानसिकरित्या ठाकला आहे आणि त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची व लयीत परतण्यासाठी ताजेतवाने होण्याची गरज आहे. विराट कोहलीनं फॉर्ममध्ये यावं, भारतासाठी धावा कराव्यात. तसेच भारताच्या इंग्लड दौऱ्यावर आणि आशिया व टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी संपूर्ण भारताची इच्छा आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)
बंगळुरूचा हैदराबादवर 67 धावांनी विजय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सनरायजर्स हैदराबादला 67 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीच्या संघानं 20 षटकात तीन विकेट्स गमावून हैदराबादसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाचा डाव 125 धावांवर आटोपला.
हे देखील वाचा-