IPL 2022 : ठरलं! आयपीएलची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये; तर क्वॉलिफायर ईडन गार्डन्सवर
IPL Playoffs : इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये 70 लीग सामन्यांपैकी 47 सामने झाले असून 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचणार आहेत.
IPL Playoffs 2022 : क्रिकेटचा महासंग्राम असणाऱ्या इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आय़पीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामातील सामनेही दरवर्षीप्रमाणे चुरशीचे आणि अटीतटीचे होत आहेत. आतापर्यंत 70 लीग सामन्यांपैकी 47 सामने झाले असून 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचणार आहेत. त्यानंतर आता प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना कुठे होणार हे नुकतंच बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत माहिती दिली असून प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद याठिकाणी होणार असून अंतिम सामना अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिलेल्या माहितीनुसार अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर क्वॉलीफायर 2 सामनाही येथेच 27 मे रोजी होईल. तर कोलकात्याच्या (Kolkata) येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे क्वॉलीफायर 1 आणि एलिमिनेटर सामना अनुक्रमे 24 आणि 25 मे रोजी पार पडेल.
कोणाचं गणित कसं?
गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे. कारण सध्या असणाऱ्या सर्व समीकरणांना पाहता हा संघ आपले उर्वरीत पाचही सामने गमावल्यास देखील पुढील फेरीत पोहचू शकतो. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये 14 पैकी 8 सामने जिंकणारा संघ पुढील फेरीत नक्कीच पोहतक असल्याचे दिसून आले आहे. त्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात.
मुंबईसह स्पर्धेबाहेर, तर चेन्नई केकेआरही जवळपास बाहेर
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत. त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे.
या पाच संघात असेल प्लेऑफमध्ये पोहचण्याची चुरस
वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे. तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत. त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.
हे देखील वाचा-