ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
समाजाचा मोर्चा नाही असे सांगतानाच मुद्दा भरकटण्यासाठी कलाकार आणले जातात, प्रीपेड रिचार्ज नेते आणले जातात, अशा शब्दात हाकेंचं नाव न घेता सुरेश धस यांनी टोला लगावला.
Suresh Dhas : ट्रॅक्टर चोरी करा, चंदन चोरी करा आणि कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत आहे. परळीमध्ये 109 मृतदेह सापडले आहेत. काहींचे फक्त हडके सापडली आहेत. आका शंभर टक्के 302 चा आरोपी आहे. आकाच आका सुद्धा लाईनमध्ये उभा असल्याचा घणाघात आमदार सुरेश धस यांनी केला. आज पैठणमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोपांची मालिकाच केली.
जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे
सुरेश धस यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले की, जरीन खानला परळी पोलिस स्टेशनमध्ये मार मार मारले आणि तो मेला. घरच्यांना 40 लाख देऊन विषय मिटवला. जरीन खानची पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हत्या झाली. व्हिडीओ शूटिंग काढून मारले, पाणी मागितल्यावर दुसरंच काही दिलं जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे. आकाचा आका एकदा जेलमध्ये जाऊ द्या, मग पहा लोक कसे पुढे येतात, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला.
प्रीपेड रिचार्ज नेते आणले जातात
यावेळी बोलताना सुरेश धस यांनी ओबीसी आंदोलनकर्ते सुरेश धस यांचाही चांगलाच नाव न घेता समाचार घेतला. ते म्हणाले की, कुणीही उठतो आणि या समाजाचा मोर्चा म्हणतात. समाजाचा मोर्चा नाही असे सांगतानाच मुद्दा भरकटण्यासाठी कलाकार आणले जातात, प्रीपेड रिचार्ज नेते आणले जातात, अशा शब्दात हाकेंचं नाव न घेता सुरेश धस यांनी टोला लगावला. कसले प्रति मोर्चे काढत आहे तुम्ही? तुम्हाला संतोष देशमुख यांची मुली, मुलाच्या डोळ्यातील पाणी तुम्हाला दिसत नाही का? जोपर्यंत राष्ट्रपती यांची दयेची मागणी फेटाळून लावत नाही, तोपर्यंत एकत्र राहायचं असल्याचे सुरेश धस म्हणाले.
अंजली दमानियांचा गंभीर आरोप
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही परळीमध्ये 109 मृतदेस सापडले आहेत त्यावरून टीका केली आहे. म्हणाल्या की, परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. फक्त यामध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसते बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. त्यांनी सांगितले की, माझं म्हणणं आहे की इकडे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तेथील आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे, म्हणूनच मी परत परत त्याच म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं असल्याचे दमानिया म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या