IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
IPL Playoffs : इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये 70 लीग सामन्यानंतर 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचणार आहेत.
IPL 2022 Playoffs : आयपीएल 2022 (IPL 2022) या क्रिकेट महासंग्रामात आतापर्यंत 47 लीग सामने खेळवले गेले आहेत. अजून 23 सामने शिल्लक असले तरी काही संघाचं पुढील फेरीत पोहोचणं तर काहीचं स्पर्धेबाहेर पोहोचणं निश्चित झालं आहे. यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ सामिल झाले असून या 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचतील. तर नेमकं कोणते संघ पुढील फेरीत पोहचू शकतात तर कोणाचं आव्हान संपुष्टात आलं आहे, या साऱ्यावर एक नजर फिरवूया...
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्सची प्लेऑफमध्ये एन्ट्री निश्चित
गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे. कारण सध्या असणाऱ्या सर्व समीकरणांना पाहता हा संघ आपले उर्वरीत पाचही सामने गमावल्यास देखील पुढील फेरीत पोहचू शकतो. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये 14 पैकी 8 सामने जिंकणारा संघ पुढील फेरीत नक्कीच पोहतक असल्याचे दिसून आले आहे. त्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात.
मुंबईसह स्पर्धेबाहेर, तर चेन्नई केकेआरही जवळपास बाहेर
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत. त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे.
या पाच संघात असेल प्लेऑफमध्ये पोहचण्याची चुरस
वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे. तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत. त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.
हे देखील वाचा-
- Virat Kohli Golden Duck: विराट कोहली चौथ्यांदा गोल्डन डकचा शिकार, चार वेळा शून्यावर गमावली विकेट
- Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ