(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Playoff 2022: प्लेऑफच्या सामन्यासाठी विराट कोहली सज्ज, कोलकाता येथे पोहोचताच शेअर केला खास फोटो
IPL Playoff 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तसे पाहता संघाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग थोडा कठीण आहे.
IPL Playoff 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तसे पाहता संघाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग थोडा कठीण आहे. दरम्यान, आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ लखनौशी भिडणार आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) 25 मे रोजी एकमेकांच्या आमने-सामने येणार आहे. त्यासाठी आरसीबीचा संघ कोलकाता येथे पोहोचला आहे. टीमचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर केला आहे. कोहलीने या फोटोला 'टच डाउन कोलकाता' असं कॅप्शन दिलं आहे.
आरसीबीनं सलग तिसऱ्या मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरसीबीचा संघा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु, या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीनं 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एवढेच नव्हेतर, आरसीबीच्या संघात अनेक स्टार फलंदाज असूनही ते 2017 आणि 2019 मध्ये गुणतालिकेत तळाशी होते.
आयपीएल 2022 मध्ये विराटची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंमागात विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, गुजरात टायटन्सविरुद्धच्या संघाच्या अखेरच्या साखळी सामन्यात कोहलीनं 73 धावा करून फॉर्ममध्ये परतला. विराटला आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यांमध्ये 309 धावा करता आल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान, विराट कोहली तीन वेळा तो गोल्डन डकचा शिकार ठरला.
आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल?
आयपीएल 2022 चा खिताब जिंकण्यासाठी आरसीबीला पहिल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौला पराभूत करावा लागेल. त्यांनंतर क्वालीफायर 2 मध्ये क्वालीफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाची सामना जिंकावा लागेल. त्यानंतर अंतिम सामन्यातही क्वालीफायर 1 मध्ये जिंकणाऱ्या संघाविरोधात विजय मिळवावा लागेल. म्हणजेच, आरसीबीच्या संघाला सलग तीन सामने जिंकणं गरजेचं आहे. हे थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही.
हे देखील वाचा-