(Source: Poll of Polls)
Jharkhand: चक्क निवडणुकीत ड्युटी करताना दिसला धोनी? एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड गर्दी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni)15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं (CSK) नेतृत्व करताना दिसत आहे.
Election, Jharkhand Panchayat Election 2022: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni)15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं (CSK) नेतृत्व करताना दिसत आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम धोनीसाठी शेवटचा ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, या हंगामातील चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात धोनीनं आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय. चेन्नईचा संघ आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीची एक वेगळीच चर्चा रंगली आहे. झारखंड पंचायत निवडणुकीत धोनीसारखा हुबेहूब दिसणार एक व्यक्ती ड्युटी करताना दिसला. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर झुंबड गर्दी केली.
झारखंडमध्ये सध्या पंचायत निवडणूक सुरू आहे. या निवडणुकांमध्ये महेंद्रसिंह धोनीचंही नाव जोडलं गेलं आहे. दरम्यान, रांचीमध्ये निवडणुकीची ड्युटी दरम्यान एका व्यक्तीनं लोकांना प्रभावित केलं. कारण तो महेंद्रसिंह धोनीसारखा दिसत होता. विवेक कुमार असं या तरुणाचे नाव आहे. तो सीसीएलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ड्युटी लावण्यात आली होती. तो पंचायत निवडणुकीत बॅलेट पेपर सेलमध्ये कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे, धोनीसारखा दिसत असल्यानं अनेक लोकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यातील काही लोकांनी त्याची भेटही घेतली. ज्यामुळं त्याला सारखंसारखं आपली ओळख दाखवावी लागली.
दरम्यान, चारवेळा चेन्नईला ट्रॉफी जिंकून देणारा धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार आहे. धोनला त्याला शेवटचा सामना चेपॉकमध्ये खेळायचा आहे. यंदा सर्व सामने मुंबई आणि पुण्यात झाले. पुढच्या वर्षी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी सामने होतील तेव्हा त्याला चेपॉकच्या मैदानावर खेळायला आवडेल. जर तो चेन्नईमध्ये शेवटचा सामना खेळला नाही तर तो CSK चाहत्यांवर अन्याय होईल.
हे देखील वाचा-
- Amir Khan: आमिर खानची आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळायची इच्छा!
- IPL 2022: साखळी सामन्यात कसं होतं राजस्थानचं प्रदर्शन, कशी मिळवली प्लेऑफमध्ये एन्ट्री?
- IPL 2022: आरसीबीचा संघ कोलकात्याला रवाना, एलिमिनेटर सामन्यात लखनौशी भिडणार; कसं असेल प्लेऑफचं वेळापत्रक?