एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा अन् T20 लीग खेळा, IPL संघमालकांकडून खेळाडूंना 50 कोटींची ऑफर!

IPL 2023 : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, यूएई येथे होणाऱ्या टी 20 लीग स्पर्धेत आयपीएलमधील संघमालकांचे संघ आहेत.

IPL 2023 : आयपीएलला जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखले जाते.  या स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरु आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्राला सुरुवात झाली होती, तेव्हापासून या स्पर्धेत अनेक बदल झाले आहेत. आयपीएलमधील संघमालकांनी इतर देशातील लीग स्पर्धेतही गुंतवणूक केली आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, यूएई येथे होणाऱ्या टी 20 लीग स्पर्धेत आयपीएलमधील संघमालकांचे संघ आहेत.  त्यामुळे आयपीएलमधील संघ मालकांनी काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून लीग स्पर्धा खेळण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची बोलणी झाल्याचे समजतेय. टाइम्स लंडन यांनी याबाबतचे वृत्त दिलेय. 

मिळालेल्या वृत्तानुसार, आयपीएलमधील काही संघ मालकांनी इंग्लंडच्या सहा खेळाडूंना ५० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून एक वर्षासाठी T20 लीग खेळण्यासाठी करार करण्याची ऑफर देण्यात आली आहे.  अनेक फ्रँचायझी खेळाडूंना वर्षभराच्या करारावर साईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या करारानुसार खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळावे लागणार आहे. इंग्लंडसह वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलच्या संघ मालकांकडून ऑफर देण्यात आली आहे. 

आयपीएलचे संघ खेळाडूंना प्रत्येक हंगामानुसार करारबद्ध केले जाते. प्रत्येक हंगामाआधी लिलाव केला जातो.  मात्र आता खेळाडूंसोबत वार्षिक करार करायण्याचा प्रयत्न केला जात आहे.  त्यासाठी इंग्लंडच्या ६ दिग्गज खेळाडूंसोबत संपर्क साधण्यात आला. यावर प्रस्तावावर वर्षाअखेरपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकते. यासाठी त्यांना 50  कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.  फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या (फिका) रिपोर्टनुसार इंग्लंडच्याच खेळाडूंन नाही तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनादेखील अशा प्रकारचे प्रस्ताव मिळत आहेत. याबाबत लवकरत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कोणत्या खेळाडूंना आयपीएलमधील कोणत्या फ्रेंचायझीने संपर्क साधला, याबाबत रिपोर्ट्समध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. पण रिपोर्ट्सनुसार,   जर एखाद्या खेळाडूने संघ मालकाचा हा करार स्वीकारला तर संबंधित फ्रेंचायझी ही त्याची पूर्णपणे मालक असेल. जर त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे असतील तर आयपीएल फ्रेचांयजीकडून परवानगी घ्यावी लागेल.  सध्या फुटबॉलमध्ये हेच सुरु आहे. फूटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटमध्येही करार केले जाणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, सध्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या परवानगी घेतात. पण जर फ्रेचांयझीने खेळाडूंना वार्षिक करार केला तर उलटे होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Embed widget