Virat Kohli : आरसीबीचा एकहाती किल्ला लढवला, विराटचं दमदार अर्धशतक, माजी क्रिकेटपटू म्हणतो... चमकत्या ताऱ्याचं आणखी एक....
IPL 2024 Virat Kohli : विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. या शतकानंतर इरफान पठाणनं त्याचं ट्विट करुन अभिनंदन केलं आहे.
जयपूर : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात जयपूर येथे आयपीएलमधील 19 वी मॅच सुरु आहे. आजच्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा आरसीबीच्या विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं घेतला. कोहली आणि डु प्लेसिसनं आरसीबीला 125 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. विराट कोहलीनं या मॅचमध्ये शतक झळकावलं. विराट कोहलीनं या शतकानंतर संवाद साधला. विराटच्या शतकासंदर्भात इरफान पठाणनं देखील भाष्य केलं आहे.
विराट कोहलीनं 72 बॉलमध्ये 12 चौकार आणि 4 सिक्सच्या जोरावर नाबाद 113 धावा केल्या. विराट कोहलीनं आयपीएलमधील गेल्या 7 डावांमध्ये तीन शतकं झळकवली आहेत. विराटनं आज 67 बॉलमध्ये शतक झळकावलं. विराटनं यापूर्वी दोन अर्धशतकं झळकवली आहेत. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतकं झळकवलं आहे. आतापर्यंत विराट कोहलीची आयपीएलमध्ये 8 शतकं झाली आहेत.
इरफान पठाण काय म्हणाला?
विराट कोहलीच्या शतकी खेळीबद्दल टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. इरफान पठाणनं विराट कोहलीचा फोटो पोस्ट करुन एक कॅप्शन लिहिलं आहे. आयपीएच्या आकाळातील सर्वाधिक चमकणाऱ्या ताऱ्याचं आणखी एक शतक, असं इरफान पठाणनं म्हटलं आहे.
विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच मॅचमध्ये 316 धावा केल्या आहेत. त्यामध्ये आजच्या मॅचमधील नाबाद 113 ही धावसंख्या सर्वोच्च आहे. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीनं जितक्या धावा केल्या आहेत. त्यापैकी 38 टक्के धावा विराट कोहलीनं केल्या आहेत. विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिसनं 109, दिनेश कार्तिकनं 90, अर्जुन रावतनं 73 आणि कॅमेरुन ग्रीननं 68 धावा केल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
विराट कोहलीनं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावा करत टी -20 क्रिकेटमधील 12 हजार धावांचा टप्पा पार केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं विराट कोहलीला पिछाडीवर टाकलं होतं. आज विराट कोहलीनं 113 धावा करत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. याशिवाय यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागिदारी देखील विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं केली आहे.
दरम्यान, वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतल्यानंतर कमबॅक करणाऱ्या विराट कोहलीनं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. विराटनं आतापर्यंत एक शतक आणि एक अर्धशतक झळकवलं आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद कोण मिळवणार? माजी क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, म्हणाला...