IPL 2024 : यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद कोण मिळवणार? माजी क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, म्हणाला...
IPL : यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 18 मॅच झालेल्या आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स दुसऱ्य स्थानी आहे.
जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील 18 मॅच पार पडलेल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. तुल्यबळ वाटणारे प्रमुख संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि मुंबई इंडियन्स यांना लौकिकाप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. गुणतालिकेत हे संघ तळाला आहेत. मुंबई इंडियन्स 10 व्या स्थानी तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आठव्या स्थानी आहे. गुणतालिकेत सध्या कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानावर आहे. तीन मॅच जिंकणारा राजस्थान रॉयल्स देखील दुसऱ्या स्थानी आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज सध्या तिसऱ्या स्थानी आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्त्वातील लखनऊ चौथ्या स्थानावर आहे. यंदाचं आयपीएल कोण जिंकणार या संदर्भात न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूनं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
यंदाचं आयपीएल कोण जिंकणार?
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूल यांनी यंदाच्या आयीपएलसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे. राजस्थाननं आतापर्यंत तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे आरसीबीला एका मॅचमध्ये विजय मिळाला आहे.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डूल यांनी यंदाच्या विजेतेपदाच्या शर्यतीत राजस्थान रॉयल्स प्रमुख दावेदार असल्याचं म्हटलं आहे. राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा चांगला वापर करुन घेतला आहे.
सायमन डूल यांनी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स मॅचसंदर्भात क्रिकबझ सोबत बोलताना हे वक्तव्य केलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीममबद्दल ते म्हणाले की या टीममध्ये लोअर ऑर्डरपर्यंत असलेली बॅटिंगची क्षमता आणि राजस्थानकडील गोलंदाज करत असलेली चांगली कामगिरी याच्या आधारे राजस्थान रॉयल्स यंदाच्या स्पर्धचे विजेते होऊ शकतात.
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स सर्वोत्तम टीम आहे. त्यांच्यामध्ये विजेतेपद मिळवण्याची क्षमता आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा पर्याय राजस्थानसाठी चांगला ठरला आहे.
राजस्थान आणि बंगळुरु आमने सामने
राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत झालेल्या तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानच्या टीमचा आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे बंगळुरुच्या संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये चार पैकी एका मॅचमध्ये विजय मिळाला आहे. बंगळुरुचा संघ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. बंगळुरु सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. बंगळुरुच्या संघाकडे विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
संबंधित बातम्या :
RCB मियां मॅजिक करणार, थेट सिराजला सलामीला धाडणार?
ब्लँक चेक घे, हवी ती रक्कम टाक, पण परत KKR मध्ये ये, शाहरुख खानची गौतम गंभीरला ऑफर