Virat Kohli :आयपीएलसाठी स्पेशल लूक, विराट कोहली एका हेअर कटसाठी किती रुपये मोजतो? लाखो रुपये फी घेणारा हेअर स्टायलीस्ट म्हणतो..
Virat Kohli : आयपीएलमध्ये बॅटिंगच्या जोरावर विरोधी बॉलर्सची झोप उडवणारा खेळाडू विराट कोहली हेअर कटसाठी किती रुपये मोजतो याबाबत अपडेट समोर आली आहे.
जयपूर : टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज आणि आयपीएलची (IPL 2024) टीम आरसीबीचा माजी कप्तान विराट कोहली (Virat Kohli) सातत्यानं चर्चेत असतो. विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतोय. विराट कोहलीनं पहिल्या चार मॅचमध्ये 203 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या कामगिरीवर आरसीबीचं भवितव्य अवलंबून आहे. विराट कोहली त्याच्या हेअर स्टाइल मुळं देखील चर्चेत असतो. सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम (Aalim Hakim) यानं विराट कोहलीकडून हेअर कटसाठी किती फी आकारतो हे सांगितलं आहे.
सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम बॉलिवूड स्टार, नामांकित खेळाडू यांच्या विविध हेअर स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे अलीम हकीम यानं विराट कोहली हेअर कटसाठी किती रुपये मोजतो यासंदर्भात माहिती दिली आहे.
अलीम हकीम हा ऋतिक रोशन, रणबीर कपूर, सचिन तेंडूलकर यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तीचा हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करतो. हकीम यानं त्याच्या कोशल्यानं बॉलिवूड कलाकार आणि नामांकित खेळाडूंचे लूक बदलले आहेत.
अलीम हकीम यानं नुकत्याच एका मुलाखतीत तो किती फी आकारतो यासंदर्भात माहिती दिली होती. माझी फी नेमकी किती आहे ते सर्वांना माहिती आहे. माझ्या फीची सुरुवात 1 लाख रुपयांपासून होते. ही फी सर्वात कमी असल्याचं हकीमनं ब्रुटशी बोलताना सांगितलं होतं.
Aalim Hakim said, "Virat Kohli's haircut cost minimum 1 Lakh INR". pic.twitter.com/F6rXgGNmR1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2024
विराट कोहलीच्या हेअर कट संदर्भात बोलताना हकीमनं नेमकं काय म्हटलंय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आयपीएल येणार असल्यानं थोडाफार वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न होता, असं हकीम म्हणाला. हेअर स्टाइल संदर्भात विराट कोहलीच्या अनेक सूचना असतात, आपण अशा प्रकारची हेअर स्टाइल करु, पुढील वेळी कोणती हेअरस्टाइल करावी यासंदर्भात तो चर्चा करत असतो, असं हकीम म्हणाला.हकीमनं विराट कोहलीच्या हेअर स्टाइलसाठी 1 लाख रुपये आकारल्याचं मुफदलाल वोहरा या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे.
विराट कोहली आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये
विराट कोहली यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीसाठी ओपनिंग करतोय. विराट कोहलीनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये 203 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं याचवर्षी टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
आज कोण जिंकणार?
आयपीएलमध्ये आज आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आले आहेत. राजस्थाननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आरसीबीनं चांगली सुरुवात केली आहे. आजच्या मॅचमध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
RR vs RCB :आरसीबीला बॅटिंगला आमंत्रण, राजस्थान बॉलिंग करणार, संजू सॅमसनचा टॉस जिंकत मोठा निर्णय