IPL 2024, SRH vs CSK Toss Update : सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय, दोन्ही टीमध्ये कुणाची वर्णी
SRH vs CSK : आयपीएलच्या 18 व्या मॅचमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईनं दोन तर हैदराबादनं एक मॅच जिंकली आहे.
![IPL 2024, SRH vs CSK Toss Update : सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय, दोन्ही टीमध्ये कुणाची वर्णी ipl 2024 srh vs csk toss update pat cummins won the toss elected bowl first against chennai super kings IPL 2024, SRH vs CSK Toss Update : सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय, दोन्ही टीमध्ये कुणाची वर्णी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/05/818a771df49d7151d20c2b30cba0d1371712324138599989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदराबाद : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने येत आहेत. आयपीएलमधील ही 18 वी मॅच आहे. हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर ही मॅच होत आहे. सनरायजर्स हैदराबाद यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवण्यास इच्छूक आहे. तर, चेन्नई सुपर किंग्ज देखील तिसरा विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. हैदराबादच्या पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी तीन तीन मॅचेस खेळल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं आरसीबी तसेच गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवला. दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
सनरायजर्स हैदराबादनं आतापर्यंत तीन मॅच खेळल्या असून त्यांना दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. हैदराबादनं मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. आज हैदराबाद त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
धोनी आणि क्लासेनच्या फलंदाजीवर लक्ष
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी यानं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध फटकेबाजी केली होती. आजच्या मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनी तशीच कामगिरी करतो का हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन यानं कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध फटकेबाजी केली होती. त्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये 167 केल्या आहेत. त्यामुळं आज चेन्नई सुपर किंग्ज पुढं हेनरिक क्लासेनचं आव्हान असेल.
धावांचा पाऊस पडणार?
सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये या स्टेडियवर धावांचा पाऊस पडला होता. हैदराबादनं 277 धावा केल्या होत्या तर मुंबईनं 246 धावा केल्या होत्या. आज देखील त्यादिवशीप्रमाणं धावांचा पाऊस पडणार का हे पाहावं लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद गेल्या वर्षी आमने सामने आले होते. तेव्हा चेन्नईनं हैदराबादला 7 विकेटनं हरवलं होतं.
चेन्नईची प्लेईंग इलेव्हन :
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डेरिल मिशेल,समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मुकेश चौधरी, तुषार देशपांडे,महेश तिक्षाणा
सनरायजर्स हैदराबादची टीम
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शहाबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, जयदेव उनाडकट
संबंधित बातम्या :
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे मुंबई इंडियन्सने केले खास स्वागत; व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)