(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 RCB: रशियन मुलीही RCB च्या प्रेमात, विराट कोहलीची टीमच IPL जिंकण्याचा विश्वास, पाहा Video
IPL 2024 RCB: बंगळुरु आणि चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी एक व्हिडीओ समोर आला आहे.
IPL 2024 RCB: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) प्ले ऑफमध्ये सध्या 2 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी 5 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आधीच पात्र झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) अजूनही स्पर्धेत आहेत.
अनेक माजी खेळाडूंनी प्ले ऑफच्या फेरीत कोणते 4 संघ असतील, याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बंगळुरु आणि चेन्नईच्या सामन्यात चेन्नई विजयी होईल, आणि बंगळुरु प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इरफान पठाण, अंबाती रायडू, मोहम्मद कैफ, मैथ्यू हेडन आणि टॉम मूडी यांनी बंगळुरुला साथ न देता चेन्नईला साथ दिली आहे. मात्र चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरुच्या समर्थनात एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुशल कौशीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये रशियन मुले आणि मुली दिसत आहेत. हे रशियन बंगळुरु आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये दोन रशियन मुली बंगळुरुसाठी कन्नडमध्ये 'इ साला कप नमदे...' असं म्हणत आहेत. म्हणजे यंदा चषक आमचाच असेल, असं बोलताना दिसत आहे.
Russians supporting #RCB ❤️ in ನಮ್ಮ ಕನ್ನಡ @RCBTweets @rcb_reddit @Im__Arfan @Sa
— ಶಶಾಂಕ್ | Shashank (@ShashankJM9) May 15, 2024
IG : https://t.co/s6bVkDpI34 pic.twitter.com/ByFQ7ovVLm
प्ले ऑफच्या फेरीसाठी बंगळुरुचं समीकरण कसं असेल?
आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबादच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे. जर हैदराबादचा उर्वरित दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला तर आरसीबी आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात.
इतर बातम्या:
किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?