Indian Cricket Team Head Coach: किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?
Indian Cricket Team Head Coach: राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, असं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले होतं.
![Indian Cricket Team Head Coach: किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण? Indian Cricket Team Head Coach: Rahul Dravid is not seeking for futher extension of indian cricket team head coach due to Personal reasons Indian Cricket Team Head Coach: किमान 1 वर्ष तरी...; वरिष्ठ खेळाडूंची विनंती, पण राहुल द्रविडचा नकार, पुढील प्रशिक्षकपदी कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/15/e9db4629226f39e591260af5c647163c1715752296573987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. याबाबत आता नवीन अपडेट्स समोर येत आहे.
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, असं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले होतं. मात्र राहुल द्रविड वैयक्तिक कारणांमुळे पुढील मुदतवाढीसाठी विचार करत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार हे नक्की झालं आहे. राहुल द्रविड यांना संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या गटाने किमान 1 वर्ष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रहावे, यासाठी विनंती केली. मात्र राहुल द्रविड यांनी अंतिम निर्णय घेतल्याचे कळवले. तसेच राहुल द्रविडनंतर वीवीएस लक्ष्मण प्रमुख दावेदार मानला जात होता. पंरतु तो देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नाही, अशी माहिती मिळत आहे.
Major updates about the Indian coaching role [Sportstar]:
— Johns. (@CricCrazyJohns) May 15, 2024
- Dravid is not seeking for futher extension due to Personal reasons
- Group of senior players requested him to stay with the test team for atleast 1 year but he made up his mind
- Laxman unlikely to apply as well pic.twitter.com/zdnfxPSpp1
न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांना भारताचे नवे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. याबाबत बीसीसीआय देखील स्टीफन फ्लेमिंग नावाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
फ्लेमिंग 2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक-
2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे माहीत आहे. आयपीएलमधील चेन्नईचे प्रशिक्षक म्हणून त्याच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.
बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता आणि अटी निश्चित केल्या आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे आहेत-
- किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.
- किमान दोन वर्षे पूर्ण सदस्य चाचणी खेळणाऱ्या देशाचे मुख्य प्रशिक्षक असले पाहिजेत.
- किमान 3 वर्षे आयपीएल संघ किंवा त्याच्या समकक्ष आंतरराष्ट्रीय लीग किंवा प्रथम श्रेणी संघ किंवा राष्ट्रीय अ संघाचे सहयोगी सदस्य किंवा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
- वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
संबंधित बातम्या:
आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार
हार्दिक पांड्या येताच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्माचा काढता पाय; नक्की चाललंय काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)