Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला होता. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना मोठा यश मिळालं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. राज्यभरातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीला 236 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला होता. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना मोठा यश मिळालं आहे. अजित पवार हे विधानसभेच्या निवडणुकीला कोणत्या तयारीने मैदानात उतरले, याबाबत अजित पवारांचे राजकीय स्ट्रॅटेजिस्ट नरेश अरोरा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना माहिती दिली आहे.
अजित पवार एकदम साधा माणूस आहे. कुठे सौम्य असावं, कुठे कडक असावं हे अजित पवारांना कळलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांना नवीन रोल दिला. त्यांच्या पक्षाला नवीन रोल दिला,असं नरेश अरोरा यांनी सांगितले. तसेच अजित पवारांना फक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळून चालणार नव्हतं. त्यांना लोकांशी संवाद साधणं, लोकांमध्ये मिसळणं आवश्यक होतं त्यामुळे आम्ही त्यांना ज्या सूचना दिल्या त्या त्यांनी ऐकल्या. पिंक कलर, जॅकेटची सुरुवात कशी झाली? हे विचारल्यावर अरोरा म्हणाले एकदा अजित पवारांना समजावून सांगितलं की हे सगळं आपण का करतोय ? त्यामागचं कारण काय? हे त्यांना कळलं, पटलं तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागत नाही. अजित पवार ते आवर्जून करतात. पिंक जॅकेटची चांगलीच चर्चा झाली. ती बाब आम्ही अजित पवारांना का करायची आहे ते सांगितल्यावर समजली. ज्यानंतर अजित पवारांना ते पटलं.
अजित पवारांनी गुलाबी जॅकेटच का निवडलं?-
अजित पवारांनी गुलाबी जॅकेटच का निवडलं?, असा प्रश्नही नरेश अरोरा यांना विचारणयात आला. यावर ज्या दिवशी अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला त्यादिवशी त्यांनी पिंक जॅकेट घातलं होतं. लाडकी बहीण योजना त्यांनी त्यावेळी अर्थसंकल्पात जाहीर केली होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की या योजनेची ओळख त्यांच्याबरोबर राहिली पाहिजे, असं नरेश अरोरा म्हणाले. पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळं, ब्राऊन जॅकेट हा सर्वसाधारण पेहराव वाटतो. त्यामुळे अजित पवारांना आम्ही स्पेशल लूक दिला. आधी चार पक्ष होते त्यानंतर सहा झाले. त्यांचे रंगही बऱ्यापैकी सारखे आहेत. मतदारांना आकर्षित करायचं होतं आणि घड्याळाशी लोकांना जोडायचं होतं, अशी माहिती नरेश अरोरा यांनी दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका आणि त्यातून सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी 'जनसन्मान यात्रा' सुरू केली होती. दररोज पांढऱ्या शुभ्र पेहरावात दिसणाऱ्या अजित पवारांनी अचानक गुलाबी जॅकेट घातल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.
अजित पवारांच्या विजयी उमेदवारांची यादी-
१) अमळनेर/ अनिल पाटील
२) अमरावती शहर / सुलभा खोडके
३) अर्जुनी-मोरगाव / राजकुमार बडोले
४) अहेरी / धर्मराव बाबा अत्राम
५) पुसद / इंद्रनील नाईक
६) प्रतापराव चिखलीकर / लोहा-कंधार
७) वसमत / राजू नवघरे
८) पाथरी / राजेश विटेकर
९) कळवण / नितीन पवार
१०) शिरूर / द्यानेश्वर कटके
११) इंदापूर / दत्ता मामा भरणे
१२) बारामती / अजित पवार
१३) येवला / छगन भुजबळ
१४) सिन्नर / माणिकराव कोकाटे
१५) निफाड / दिलीप बनकर
१६) दिंडोरी / नरहरी झिरवळ
१७) देवळाली / सरोज अहिरे
१८) पारनेर / काशिनाथ दाते
१९) अकोले / किरण लहामटे
२०) इगतपुरी / हिरामण खोसकर
२१) शहापूर / दौलत दरोडा
२२) अणुशक्ती नगर / सना मलिक
२३) श्रीवर्धन / अदिती तटकरे
२४) आंबेगाव / दिलीप वळसे पाटील
२५) भोर / शंकर मांडेकर
२६) मावळ / सुनील शेळके
२७) पिंपरी / अण्णा बनसोडे
२८) हडपसर / चेतन तुपे
२९) कोपरगाव / आशुतोष काळे
३०) अहमदनगर शहर / संग्राम जगताप
३१) गेवराई / विजयसिंह पंडित
३२) माजलगाव / प्रकाश सोलंके
३३) परळी / धनंजय मुंडे
३४) अहमदपूर-चाकूर / बाबासाहेब पाटील
३५) उदगीर / संजय बनसोडे
३६) फलटण / सचिन पाटील
३७) वाई / मकरंद पाटील
३८) चिपळूण / शेखर निकम
३९) कागल / हसन मुश्रीफ
४०) तुमसर / राजू कारेमोरे
४१) सिंदखेड राजा / मनोज कायंदे