(Source: ECI/ABP News/ABP Majha)
18 कोटीत अनुभव विकत घेता येत नाही, सॅम करनच्या कामगिरीवर सेहवाग भडकला
Sam Curran : गुरुवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाली आरसीबीने पंजाबचा २४ धावांनी पराभव केला. पंजाबच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवान याने पंजाबला चांगलेच फटकारले आहे.
Virender Sehwag slams Sam Curran : गुरुवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाली आरसीबीने पंजाबचा २४ धावांनी पराभव केला. पंजाबच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवान याने पंजाबला चांगलेच फटकारले आहे. सॅम करन याच्या खेळीचाही सेहवागने समाचार घेतला. वीरेंद्र सेहवाग याला रोखठोख विचारासाठी ओळखले जाते. पंजाबच्या पराभवानंतर सेहवागने कर्णधारला आणि संघाला चांगलेच फटकारलेय.
पंजाबचा कर्णधार सॅम करन फलंदाजी करताना हराकिरी करताना दिसला. पंजाबचा संघ अडचणीत सापडला असताना सॅम करन याने आपली विकेट फेकली. सॅम करन वैयक्तिक दहा धावावर असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला. वानिंदु हसरंगा याने सॅम करन याला धावबाद केले. त्यानंतर वीरेंद्र सेहवान याने सॅम करन याला चांगलेच फटकारले. त्याशिवाय सॅम करन याच्या आयपीएल लिलावातील किंमतीवरही प्रश्न उपस्थित केले. १८ कोटी रुपये देऊन तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाहीत, असे सेहवागने फटकारले.
क्रिकबजसोबत बोलताना वीरेंद्र सेहवाग याने सॅम करन याला फटकारले. सेहवाग म्हणाला की, सॅम करन एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. पण तुम्ही १८ कोटी रुपयात अनुभव विकत घेऊ शकत नाही. तो खेळल्यानंतरच येतो. १८ कोटी रुपयांना खरेदी केलेय... तो आपल्याला सामना जिंकून देईल असा आपण विचार करतो.. पण अजून सॅम करन याला खूप काही अनुभव घ्यायचा आहे. आजच्या सामन्यात सॅम करन याला धाव घेण्याची गरज नव्हती... त्यामुळेच तो धावबाद झाला. सॅम करन कर्णधार आहे, त्याला अखेरच्या षटकांपर्यंत मैदानावर थांबायला हवे होते.. पण अनुभव नसल्यामुळे धावबाद झाला.. याची किंमत पंजाबने चुकवली, असे सेहवाग म्हणाला.
पंजाबचा पराभव, आरसीबीने मिळवल विजय
IPL 2023, PBKS vs RCB: विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा पराभव केला आहे. 174 धावांचा बचाव करताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. पंजाबचा संपूर्ण डाव 150 धावांत संपुष्टात आला. पंजाबकडून प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांनी झुंज दिली. पण इतर फंलदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज याने भेदक गोलंदाजी केली. पावरप्लेमध्ये दोन विकेट घेतल्या.. आणि अखेरच्या षटकात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज याने चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. त्याशिवाय वानंदु हसरंगा याने दोन विकेट घेतल्या. वेन पार्नेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.