IPL 2023 Orange & Purple Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गिलला मागे टाकून सूर्या तिसऱ्या स्थानी; तर पर्पल कॅपवर Rashid khanचा कब्जा
IPL 2023 Orange-Purple Cap Holder: काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठे बदल झाले आहेत.
IPL 2023 Orange-Purple Cap Holder after MI vs GT Match : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सर्वात आधी फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 191 धावांवर गारद झाला. हा सामना मुंबई इंडियन्सनं 27 धावांनी जिंकला. कालच्या सामन्यात मुंबईचा तारणहार ठरला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav).
या सामन्यात सूर्यकुमार यादवनं मुंबई इंडियन्सकडून शतक झळकावलं. सूर्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलं शतक होतं. दुसरीकडे गुजरात संघाकडून राशिद खाननं संघाचा डाव सांभाळला आणि आयपीएल कारकिर्दीतीलं पहिलं अर्धशतक झळकावलं. या सामन्यात सूर्यकुमार यादवचं शतक आणि रशीद खानच्या विकेट्सच्या फटकेबाजीनंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत रोमांचक बनली आहे. जाणून घेऊया ऑरेंज आणि पर्पल कॅपमध्ये काय बदल झाले?
IPL 2023 Orange Cap Holder: फॉफ डुप्लेसीच्या ताब्यात आहे ऑरेंज कॅप
ऑरेंज कॅप सध्या फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) ताब्यात आहे. RCB चा कर्णधार फाफ डुप्लेसीनं IPL 2023 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 11 सामन्यांमध्ये एकूण 576 धावा केल्या आहेत. KKR विरुद्ध 98 धावांची धडाकेबाज खेळी करून यशस्वी जायस्वाल (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 12 सामन्यात 575 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यशस्वीला ऑरेंज कॅपचा ताबा घेण्यासाठी फक्त एकाच धावेची गरज आहे. आता प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा.
शुभमन गिलनं 11 सामन्यांत 469 धावा केल्या आहेत. पण गिलला मागे टाकत सूर्यकुमार यादवनं तिसरं स्थान पटकावलं आहे. सूर्यानं आतापर्यंत 12 सामन्यांत 479 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 475 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. डेव्हॉन कॉनवे 12 सामन्यांत 468 धावांसह पाचव्या स्थानावर तर विराट कोहली 420 धावांसह सहाव्या स्थानावर आहे.
IPL 2023 Purple Cap: राशिद खाननं केलाय पर्पल कॅपवर कब्जा
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर पर्पल कॅपच्या (Rashid Khan Purple Cap) शर्यतीत मोठा बदल झाला आहे. रशीद खाननं मुंबईविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेताच पर्पल कॅपवर कब्जा केला. राशिदनं तिसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर उडी घेतली.
राशिद खाननं या सीझनमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले असून 21 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर युजवेंद्र चहल आहे, त्यानं 12 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शामी असून आयपीएल 2023 मध्ये एकूण 12 सामने खेळत 19 विकेट्स घेतल्यात. तुषार देशपांडेनं 19 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानी आहे. तर पीयूष चावला 17 विकेट्स घेत पाचव्या स्थानी आहे.