एक्स्प्लोर

पहिला सामना देवाला की मुंबई इंडियन्स परंपरा मोडणार? 2013 पासून IPL ची पराभवाने सुरुवात

MI in IPL : पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स आज यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे.

Mumbai Indians in IPL : पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स आज आरसीबीसोबत यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. आरसीबी आणि मुंबई या दोन्ही संघ विजयाने सुरुवात कऱण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पण मुंबईचा संघ पहिला सामना जिंकणार का? आरसीबी मुंबईवर भारी पडणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आलेय. त्याला कारणही तसेच आहे.. मागील दहा वर्षांत मुंबईला पहिला सामना एकदाही जिंकता आलेला नाही. हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव झालेला आहे. यावर अनेक मिम्स अन् फोटो व्हायरल होत आहे. पंरपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन असे म्हणत अनेकांनी मुंबईचा संघ पहिला सामना हरु शकते.. असेच म्हटलेय. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईलाही त्यांच्या चाहत्यांचा पाठिंबा आहे. मुंबईचे चाहते पहिला सामना देवाला.. असे म्हणत आरसीबीच्या चाहत्यांना हिनवत आहेत. 

आरसीबीचा संघ आजच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दोन्ही संगात झालेल्या मागील पाच सामन्यात आरसीबी सरस ठराली आहे. पाच सामन्यात आरसीबीने तीन वेळा विजय मिळवला आहे. तर मुंबईला दोन वेळा विजय मिळवता आला आहे. आजचा सामना जिंकून आरसीबी विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर मुंबईचा संघ आपली कामगिरी सुधारण्यासाठी मैदानात उतरेल. 

2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जवळपास 10 हंगमापासून मुंबईने सातत्याने पहिला सामना गमावला आहे.  यंदा मुंबई आपला नकोसा विक्रम मोडणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.  

गेल्या वर्षी मुंबईची खराब कामगिरी

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाचा 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तर फक्त चार सामने जिंकता आले होते. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. 

गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी कशी ?

2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफ मध्ये जागा मिळवली होती. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 14 सामन्यात 8 विजय मिळवले होते तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जाएंट्स संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. रविवारपासून आरसीबी आपल्या यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ करणार आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण यंदा केजीएफ आरसीबीला चषक उंचावून देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget