IPL 2023 : 'दुर्दैवी विकेट्स आणि भागीदारीचा अभाव'; मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, प्रशिक्षक मार्क बाऊचरनं सांगितलं खरं कारण
CSK vs MI, IPL 2023 : मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सला नांगी टाकायला भाग पाडलं. चेन्नईने मुंबईचा सात विकेट्सने पराभव केला.
Mumbai Indians Mark Boucher : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात रविवारी चुरशीचा (CSK vs MI) सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांची नाचक्की केली. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईच्या संघ गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये कमी पडला. परिणामी मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई संघाला अद्याप आयपीएल 2023 मध्ये खातंही उघडता आलेलं नाहीय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक मार्क बाऊचर याने पत्रकार परिषदेत बोलताना पराभवाचं कारण सांगितलं.
'दुर्दैवी विकेट्स आणि भागीदारीचा अभाव'
मुंबई इंडियन्सचा कोच मार्क बाऊचरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ''दुर्दैवी विकेट, काही चांगले झेल आणि भागीदारीचा अभाव आम्हाला महागात पडला.'' मार्क बाउचरनं पुढे सांगितलं की, ''प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नाही तर पराभवानंतर पुन्हा जिद्दीनं लढणं महत्त्वाचं आहे. आमच्या घरच्या मैदानावर आमच्या संघाचा खेळ ठरल्याप्रमाणे झाला नाही. पण या सामन्यातील चुकांमधून शिकलेल्या धड्यांमुळे आम्ही पुढील सामन्यात मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होण्यास मदत होईल.''
Head Coach Mark Boucher points out the particulars in the aftermath of our defeat in #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) April 9, 2023
Read the full post-match article 👇#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPLhttps://t.co/63kI04WK7Z
MI vs CSK : मुंबई इंडियन्सच्या कोचनं सांगितलं पराभवाचं कारण
मुंबई संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरने पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ''आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली पण, नंतर आमची फलंदाजी कोलमडली. काही दुर्दैवी विकेट्स गेल्या आणि काही चांगले झेल यामुळे आम्हाला चांगली भागीदारी उभारता आली नाही. मला वाटतं की, आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली झुंज दिली, पण आम्हाला चेन्नईवर दबाव टाकता आला नाही.''
CSK vs MI : चेन्नईची मुंबईवर सात विकेट्सने मात
आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या मोसमातील बारावा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात पार पडला. चेन्नईने मुंबईवर सात गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. शनिवारी झालेल्या रोमांचक सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आयपीएल 2023 मधील हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव होता. मुंबई संघाने यंदाच्या मोसमात अजून खातंही उघडलं नाहीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :