एक्स्प्लोर

IPL 2023 : CSK चा मुंबईत धमाका! आता चेन्नईत दंगा; सामन्यानंतर नक्की काय म्हणाला सुरेश रैना, पाहा Video

CSK vs MI : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा मुंबईच्या घरच्या मैदानावर पराभव केला. यानंतर सुरेश रैनाने काय प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या.

Suresh Raina on CSK won on MI : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दमदार विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुंबईच्या घरच्या मैदानावर पराभव केला. चेन्नईने (CSK) मुंबईवर (MI) सात विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव असून मुंबईला (MI) अजून खातंही उघडता आलेलं नाही. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. दरम्यान, चेन्नईच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाची माजी खेळाडू सुरेश रैना याने प्रतिक्रिया दिली आहे.

MI vs CSK : चेन्नईचा मुंबईत धमाका!

चेन्नई सुपर किंग्सने सामन्यानंतर सुरेश रैनाचा (Suresh Raine) एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश रैनाने मुंबई आणि चेन्नई यांच्यातील अटीतटीच्या लढतीबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आता चेन्नई संघाला चेन्नईमध्ये सामना जिंकताना पाहायला आवडेल. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईच्या मैदानावर चांगली खेळी केली. आता आयपीएल स्पर्धा रोमांचक वळणावर आहे. अजिंक्य राहणेनं आज चांगली अर्धशतकी खेळी केली. रविंद्र जडेजाने चांगला झेल घेतला. धोनीनंही दमदार षटकार ठोकले. चेन्नईचा खेळ उत्तम होता.'

पाहा व्हिडीओ : सुरेश रैना काय म्हणाला?

सुरेश रैनाने सप्टेंबर 2022 मध्ये आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. रैना याआधी IPL 2021 मध्ये खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याने 12 सामन्यांमध्ये 17.77 च्या सरासरीने 160 धावा केल्या. आयपीएल 2021 मध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. 2021 च्या हंगामातील खराब फॉर्मनंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला कायम ठेवलं नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. मात्र त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही.

त्यानंतर, सुरेश रैना आयपीएलच्या 2022 हंगामात होस्ट ब्रॉडकास्टरमध्ये तज्ज्ञ आणि कॉमेंट्री करताना दिसला. यंदाच्या आयपीएल 2023 मध्येही सुरेश रैना तज्ज्ञ आणि कॉमेंटेटर म्हणून दिसत आहे. सुरेश रैना यंदा आयपीएल खेळत नसला तरी, त्याची चेन्नई सुपर किंग्स संघाशी असलेली नाळ तुटलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : चेन्नईच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये उडी, गुणतालिकेची स्थिती काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Embed widget