(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Points Table : चेन्नईच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये उडी, गुणतालिकेची स्थिती काय?
CSK vs MI, IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेतली आहे. पहिल्या स्थानावर कोणता संघ आहे जाणून घ्या.
IPL 2023 Points Table Updates : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या मोसमातील बारावा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात पार पडला. चेन्नईने मुंबईवर सात गडी राखून धमाकेदार विजय मिळवला. यासोबतच चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएल 2023 मधील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर चेन्नई संघाने दुसऱ्या सामन्यात लखनौचा पराभव केला. त्यानंतर रविवारी विजयाची मालिका कायम राखत मुंबई संघाचा पराभव केला. सध्या चेन्नई संघाचा नेट रनरेट 0.356 आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दोन मोठे सामने एका शनिवारी खेळले गेले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा 57 धावांनी पराभव केला. त्यानंतर शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला, हा मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव होता. या दोन मोठ्या सामन्यांनंतर आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत (IPL 2023 Points Table) मोठा बदल झाला आहे.
Impact Player @RayuduAmbati with the winning runs 💥
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
A 7⃣-wicket win in Mumbai for @ChennaiIPL 💛😎
Scorecard ▶️ https://t.co/rSxD0lf5zJ#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/aK6Npl8auB
विजयासह राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सने पहिला क्रमांक पटकावला आहे. गुणतालिकेमध्ये एकूण पाच संघांकडे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
IPL 2023 Points Table : गुणतालिकेची सध्याची स्थिती काय?
Insightful post-match conversations ft. MSD & SKY 🤗#TATAIPL | #MIvCSK | @msdhoni | @surya_14kumar pic.twitter.com/bfaxJMbNlu
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. राजस्थानने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले असून संघाकडे सध्या 4 गुण आहेत. सध्या राजस्थान संघाचा नेट रनरेट 2.067 आहे. यानंतर, लखनौचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौकडे देखील 4 गुण आहेत आणि संघाचा नेट रनरेट 1.358 आहे. तिसऱ्या स्थानावर गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ आहे. गुजरात आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि संघाचा निव्वळ नेट रनरेट 0.700 आहे. चौथ्या स्थानावर चेन्नई आहे.
पंजाब किंग्स संघ आता गुणतालिकेत 4 गुणांसह पाचव्या स्थानावर असून संघाचा नेट रनरेट 0.333 आहे. यानंतर सहाव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे. केकेआर संघाचा नेट रनरेट 2.056 आहे. सातव्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. आरसीबीकडे 2 गुण असून संघाचा निव्वळ रनरेट -1.256 आहे.
'या' तीन संघाना खातं उघडता आलं नाही
आयपीएल 2023 मधील 12 सामने झाल्यानंतर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ पॉइंट टेबलवर शेवटच्या तीन स्थानावर आहेत. तिन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, तर मुंबई संघाचा नेट रनरेट -1.394 आहे. सलग 3 पराभवानंतर दिल्लीचा रनरेट -2.092 आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा रनरेट पराभवानंतर -2.867 आहे.