राहुल वादळाला आरसीबी कसे रोखणार, 7 डावात 474 धावांचा पाडलाय पाऊस
KL Rahul against RCB : आरसीबीविरोधात केएल राहुल याने आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे.
KL Rahul in the last 7 innings against RCB : आरसीबीविरोधात केएल राहुल याने आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे. एकेकाळी आरसीबीचा सदस्य असणाऱ्या राहुलने नंतर त्याच संघाच्या गोलंदाजांची पिसे काढली आहेत. राहुलने आरसाबीविरोधात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. मागील सात डावात राहुलने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतलाय. सात डावात तीन वेळा नाबाद राहिलाय. राहुलने आरसीबीविरोधात मागील सात डावात 118.5 च्या सरासरीने आणि 148.59 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. आरसीबीला विजय मिळवायचा असेल तर राहुलला लवकर तंबूत पाठवावे लागेल. मागील सात डावात राहुल एकदाही 30 च्या आत बाद झालेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात राहुल आरसीबीची डोकेदुखी वाढवू शकतो.
केएल राहुलने आरसीबीविरोधात मागी सात डावात तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावत 474 धावा केल्या आहेत. यादरम्यान राहुल तीन वेळा नाबाद राहिलाय.
42 (27), 132* (69), 61* (49), 91* (57), 39 (35), 30 (24), 79 (58) अशा धावा राहुलने मागील सात डावात आरसीबीविरोधात केल्या आहेत.
केएल राहुलचे होम ग्राउंड
आकडेवारीवरुन राहुल आरसीबीविरोधात मोठी खेळी करतो, हे स्पष्ट होतेच. पण लखनौसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आज होणारा सामना राहुलच्या होम ग्राऊंडवर होत आहे. राहुल मुळचा कर्नाटकचा आहे. त्याचे होम ग्राऊंड एम चिन्नास्वामी स्टेडिअम आहे. तो घरच्या मैदानावर अधिक आक्रमकपणे फलंदाजी करु शकतो. त्याशिवाय प्रेक्षकांचा सपोर्टही मिळू शकतो.
लखनौला विजायाची गरज -
केएल राहुल याची बॅट आरसीबीविरोधात तळपतेय. पण लखनौला आतापर्यंत आरसीबीविरोधात विजय मिळवता आलेला नाही. गेल्या हंगामातील दोन्ही सामन्यात आरसीबीने बाजी मारलेली आहे. अशा परिस्थितीत लखनौला पहिल्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
KL Rahul in the last 7 innings against RCB:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 10, 2023
42 (27), 132* (69), 61* (49), 91* (57), 39 (35), 30 (24), 79 (58).
- 474 runs at an average of 118.5 and 148.59 Strike Rate. pic.twitter.com/WmRXowQfwy
राहुलने वेगाने धावा कराव्यात - रवी शास्त्री
माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी राहुल याला वेगाने धावा कऱण्याचा सल्ला दिला. ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, केएल राहुल आज मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्या मते त्याने वेगाने धावा करायला हव्यात. काइल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस आणि क्विंटन डी कॉक यासारखे तगडे फलंदाज लखनौकडे आहे. अशात राहुलने वेगाने धावा करायला हव्यात. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता येईल.