IPL Points Table: मुंबईच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठे बदल; गुजरात अव्वल स्थानी, इतर संघांची परिस्थिती काय?
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम रोमांचक स्थितीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम रोमांचक स्थितीत पोहचला आहे. या हंगामातील पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. सलग आठ सामने गमावून मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नऊ संघाला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्व स्थानावर आहे. तर, एकही सामना जिंकता न आलेला मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.
आज पंजाबच्या संघाशी भिडणार चेन्नईचा संघ
आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 38 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या हंगामात पंजाब किंग्जनं सात सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, चेन्नईच्या संघाला सात पैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. यामुळं आजचा सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएल 2022 ची गुणतालिका-
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | NR | गुण | NRR |
1 | गुजरात टायटन्स | 7 | 6 | 1 | 0 | 0 | 12 | +.396 |
2 | सनरायझर्स हैदराबाद | 7 | 5 | 2 | 0 | 0 | 10 | +0.691 |
3 | राजस्थान रॉयल्स | 7 | 5 | 2 | 0 | 0 | 10 | +0.432 |
4 | लखनऊ सुपर जायंट्स | 8 | 5 | 3 | 0 | 0 | 10 | +0.334 |
5 | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | 6 | 4 | 2 | 0 | 0 | 8 | -0.472 |
6 | दिल्ली कॅपिटल्स | 7 | 3 | 4 | 0 | 0 | 6 | -0.715 |
7 | कोलकाता नाईट रायडर्स | 8 | 3 | 5 | 0 | 0 | 6 | +0.080 |
8 | पंजाब किंग्स | 7 | 3 | 4 | 0 | 0 | 6 | -0.562 |
9 | चेन्नई सुपर किंग्स | 7 | 2 | 5 | 0 | 0 | 2 | -0.534 |
10 | मुंबई इंडियन्स | 8 | 0 | 8 | 0 | 0 | 0 | -1.000 |
पंजाब किंग्ज- चेन्नई सुपर किंग्ज हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज 27 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्जनं 16 सामने जिंकले आहेत. तर, पंजाबच्या संघानं 11 सामने जिंकले आहे. ही आकडेवारी पाहता चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. परंतु, या हंगामातील पहिल्या टप्प्यात चेन्नई- पंजाब एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात पंजाबच्या संघानं विजय मिळवला होता.
हे देखील वाचा-