KL Rahul: मुंबईविरुद्ध तळपते केएल राहुलची बॅट, पाहा गेल्या 9 सामन्यांची आकडेवारी
LSG vs MI: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) खेळल्या जात असलेल्या सामन्यात शतक झळकावलं.
LSG vs MI: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) खेळल्या जात असलेल्या सामन्यात शतक झळकावलं. त्यानं 62 आपलं शतक पूर्ण केलं आहे. ज्यात 12 चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. केएल राहुलचे या मोसमातील हे दुसरे शतक आहे. या हंगामात यापूर्वीही त्यानं मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावलं होतं. आकडेवारीनुसार, केएल राहुलनं नेहमीच मुंबईच्या गोलंदाजावर भारी पडला आहे.
मुंबई विरुद्ध गेल्या 9 सामन्यात केएल राहुलची बॅट तळपल्याची पाहायला मिळालं. या नऊ सामन्यात केएल राहुलं तीन शतक ठोकली आहेत. तर, चार अर्धशतक केली आहेत. एवढेच नव्हे तर, पाच सामन्यात तो नाबाद राहिला आहे. केएल राहुलची मुंबईविरुद्ध कामगिरी कशी होती? सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलची मागील 9 डावातील कामगिरी
चेंडू | धावा |
60 | 94 |
57 | 71 नाबाद |
64 | 100 नाबाद |
19 | 17 |
51 | 77 |
52 | 60 नाबाद |
22 | 21 |
60 | 103 नाबाद |
62 | 103 नाबाद |
मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या आयपीएल 2022च्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- LSG Vs MI: पुन्हा केएल राहुल वानखेडेच्या मैदानावर बसरला! 62 चेंडूत ठोकलं शतक, लखनौचं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य
- IPL 2022: "आयपीएलमुळं मायकेल क्लार्कसोबतच्या नात्यात विष पसरलं" एंड्रयू साइमंड्सच्या वक्तव्यानं खळबळ!
- RCB Vs SRH: 'रन मशीन' विराट कोहली आणि 'श्रीनगर एक्स्प्रेस' उमरान मलिकचा फोटो व्हायरल