एक्स्प्लोर

LSG Vs MI: मुंबईचा सलग आठवा पराभव, सामन्यातील 10 महत्वाच्या मुद्द्यांवर टाका एक नजर

LSG Vs MI:  मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं.

LSG Vs MI:  मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आल्या.

लखनौ- मुंबईच्या सामन्यातील महत्वाचे 10 मुद्दे

- लखनौविरुद्ध वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

- या सामन्यात लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात क्विटंन डी कॉकला बाद झाला. 

- त्यानंतर केएल राहुल आणि मनीष पांडेनं लखनौच्या संघाचा डाव सावरला.

- मनीष पांडे बाद झाल्यानंतरही लखनौच्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. मात्र, कर्णधार केएल राहुलनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली.

- अखेरच्या षटकापर्यंत क्रिजवर उभं राहून केएल राहुलनं 62 चेंडूत शतक ठोकलं. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौनं मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं

- लखनौच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेवीस स्वस्तात माघारी परतला.

- दरम्यान, रोहित शर्मानं संयमी खेळी दाखवत संघाचा स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. रोहितनं 31 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

- रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आली. मात्र, आयुष बदोनीनं त्याला सात धावांवर बाद करून माघारी धाडलं.

- मुंबईचे चार विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेल्या तिळक वर्मानं आक्रमक फलंदाजी केली. परंतु, तोही संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.

- त्यानंतर मुंबईची शेवटची आशा पोलार्डही क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईनं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget