PBKS vs SRH, Toss Updatae : हैदराबादनं नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, पंजाबचा कर्णधार मयांक सामन्याला मुकणार; पाहा आजची अंतिम 11
आजच्या सामन्याला पंजाब संघात मोठा बदल झाला असून मयांक अगरवाल संघात नसल्याने आज कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आलं आहे.
PBKS vs SRH : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 28 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद अशी (PBKS vs SRH) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून सनरायजर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाबला आधी फलंदाजी करावी लागणार आहे. पंजाब संघाचा कर्णधार मयांक अगरवालच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे आज तो सामना खेळू शकणार नसल्याची माहिती शिखर धवनने दिली असून शिखर आज पंजाबचा कर्णधार असेल. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहे.
आज पार पडणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) हे दोन्ही संघ मैदानात एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत समान सामने खेळले असून समाने विजय आणि पराजय त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे आज जिंकणारा संघ एका अधिक गुणासह गुणतालिकेत वर झेप घेऊ शकतो. आज दोन्ही संघानी काही महत्त्वाचे बदल केल्याचंही समोर आलं आहे. तर नेमके अंतिम 11 खेळाडू कोण आहेत ते पाहूया...
पंजाब अंतिम 11
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टोव्ह, प्रभसिमरन सिंह, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, राहुल चाहर
हैदराबाद अंतिम 11
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, शशांक सिंह, जगदीशा सुचित, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन
हे देखील वाचा-
- MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय