![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
GT vs PBKS, Match Live updates : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 48 वा सामना गुजरात आणि पंजाब या दोघांमध्ये नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे.
LIVE
![GT vs PBKS, Match Live updates : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय GT vs PBKS, Match Live updates : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/de18802d5ac6e3eda03400a6fc00af5d_original.jpeg)
Background
GT vs PBKS, Live Score : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) टेबल टॉपर गुजरात टायटन्स आज मैदानात उतरणार आहेत. आजचा 48 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स (GT vs PBKS)असा पार पडणार आहे. आज मैदानात उतरणाऱ्या गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत सर्वात वर स्थान मिळवलं असून त्यामुळेच आजचा विजय त्यांचं पुढील फेरीचं तिकिट जवळपास निश्चित करेल. दुसरीकडे पंजाब संघाने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत थेट आठव्या स्थानावर आहेत.
आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात (D.Y. Patil Stadium) पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजासह गोलंदाजांना मदत मिळाल्याने सामने चुरशीचे होत आहे. मोठी धावसंख्या उभी राहत नसली तरी सामना अटीतटीचा होत आहे. आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
गुजरात संभाव्य अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
पंजाब संभाव्य अंतिम 11
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा
हे देखील वाचा-
- KKR Vs RR: नितीश राणा, रिंकू सिंहची दमदार कामगिरी; कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
- IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
- IPL 2022: 'या' एका चुकीमुळं कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून पडेल बाहेर
GT vs PBKS : गुजरातनं सामना गमावला, पंजाबचा आठ विकेट्सनं विजय
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे.
पंजाबला दुसरा झटका, भानुका राजपक्षे आऊट
गुजरातच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला दुसरा झटका बसलाय. भानुका राजपक्षे 28 चेंडूत 40 धावा करून बाद झाला आहे.
GT vs PBKS : पंजाबचा सलामीवीर बाद
पंजाबचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला तंबूत धाडलं आहे.
GT vs PBKS : गुजरातचं पंजाबसमोर 144 धावाचं लक्ष्य
गुजरात संघाने साई सुदर्शनच्या नाबाद 64 धावांच्या मदतीने 144 धावांचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
GT vs PBKS : राशिद शून्यावर बाद
रबाडाने राशिद खान यालाही शून्य धावांवर तंबूत धाडलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)