Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Ladki Bahin Yojana : अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा केली.
Ladki Bahin Yojana : मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Government Budget) सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प (Budget 2024) महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली.
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल."
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladli Behna Yojana in Maharashtra)
- लाभार्थी : 21 ते 60 वय असलेल्या महिला
- अट : वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी
या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली.
राज्यातील शिंदे सरकार लवकरच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्याची शक्यता आहे. राज्यातील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अलिकडेच राज्य सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांचं एक पथक मध्य प्रदेशला पाठवलं होतं. या पथकाद्वारे मध्य प्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा अभ्यास करण्यात आला. ही योजना कशी राबवली जाते? त्यासाठी नेमके प्रारूप काय आहे? यासाठी काय-काय तरतूदी काय असतील? याचा या पथकानं अभ्यास केला.
मध्य प्रदेशमधील 'लाडली बहणा योजना' काय आहे? (What is Ladli Behna Yojana)
मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या जोरावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. महिला मतदारांनी त्यांना भरभरून मतं दिली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीतही येथे भाजपने 29 पैकी 29 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबवल्यास महायुतीला फायदा होईल, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना असावी.
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे
- मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा. मुख्यमंत्री
- लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड
- हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
- मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक
- दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ
- स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र
- कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
- पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित
- प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार
- शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार
- गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील
- कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार