Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले
Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले
हेही वाचा :
पुण्यातील कल्याणीनगर भागात गतमहिन्यात झालेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याला उडता पंजाब म्हणणं योग्य नाही, असे म्हटले. तसेच, पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी 293 च्या प्रस्तावानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे अपघातप्रकरणी पोलिसांच्या दोन चुका झाल्याचंही मान्य केलं.
विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, आज विरोधकांचा 293 चा प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये चंदा लो धंदा दो अशा प्रकारचे वाक्य टाकलं होतं. मात्र, ते वाक्य का वगळण्यात आलं हे आम्हाला माहीत नाही. सरकार यावर चर्चा करायला का घाबरते, असा सवाल करत आमच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. या सभागृहात नियम आहेत, जे काही सभागृहात येणे योग्य नाही ते वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य मी वगळलेलं आहे, असे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी वडेट्टीवारांच्या प्रश्नावर दिले.