एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

IPL 2021 | केकेआरने कुलदीप यादवला रिटेन केल्यामुळे गौतम गंभीर हैराण; म्हणाला...

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सने आगामी सीझनमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला रिटेन केल्यामुळे गौतम गंभीर हैराण झाला आहे.

IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या 14व्या सीझनमध्ये आयपीएल 2021 साठी सर्व संघांनी आपल्या संघातीन रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातील चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव यालाही रिटेन करण्यात आलं आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सच्या या निर्णयामुळे माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर हैराण झाला आहे. कारण गौतम गंभीरला कुलदीप यादवला यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये दुसऱ्या संघामधून खेळताना पाहायचं होतं.

मी कुलदीप यादवला रिटेन केल्यामुळे हैराण आहे : गौतम गंभीर

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बातचित करताना म्हटलं की, "मी कुलदीप यादवला KKR ने रिटेन केल्यामुळे हैराण आहे. कारण त्या संघात कुलदीपला खेळण्यासाठी जास्त संधी दिली जात नाही. आयपीएल 2021 मध्ये कुलदीपला दुसऱ्या फ्रेंचायझीमधून खेळताना पाहायचं आहे. जिथे त्याला खेळण्यासाठी संधी मिळतील. जर तुम्ही टीम इंडियासाठी खेळत असाल आणि एका फ्रॅंचायझी टीममध्ये तुम्हाला खेळण्यासाठी संधी मिळत नसेल तर, हे तुमच्या करिअरसाठी अत्यंत वाईट आहे."

दरम्यान, गौतम गंभीरने आपल्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचा किताब मिळवून दिला आहे. गौतम गंभीर पुढे बोलताना म्हणाला की, "आता जेव्हा कुलदीप यादवला रिटेन करण्यात आलं आहे. तर त्याला संघात स्थान दिलं गेलं पाहिजे. माझं असं मत आहे की, कुलदीपने स्वतःच यासंदर्भात निर्णय घेतला पाहिजे. जर त्यासा केकेआरच्या संघात खेळायला मिळणार नसेल, तर त्याला इतर संघात जाण्याची आणि खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे."

IPL 2021 | आयपीएलमध्ये RCBच्या 'या' खेळाडूची 100 कोटींहून अधिक कमाई

गेल्या सीझनमध्ये कुलदीपने खेळले केवळ 14 सामने

दरम्यान, आयपीएल 2020 मध्ये कुलदीप यादवला केवळ पाच सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. तसेच आयपीएल 2019 मध्ये त्याने नऊ सामने खेळले होते. यादरम्यान, 14 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 विकेट्स घेतले होते.

KKR ने 'या' खेळाडूंना केलं रिलीज

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2021 साठी टॉम बँटन, क्रिस ग्रीन, निखिल नाईक, एम सिद्धार्थ आणि सिद्धेश लाड यांना रिलीज केलं आहे.

IPL 2021: राजस्थान रॉयल्सने कुमार संगकाराला दिली 'ही' महत्त्वपूर्ण जबाबदारी

KKR ने 'या' खेळाडूंना केलं रिटेन

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2021 साठी कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्यूसन, सुनील नारायण, इयोन मॉर्गन (कर्णधार), पैट कमिंस आणि टिम सीफर्टला रिटेन केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
Rupali Chakankar: सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 09 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 09 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं
Bhanudas Murkute: तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
तब्बल 7 तास सुनावणी अन्... नगरच्या माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं काय आहे प्रकरण?
Shardiya Navratri 2024 : आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
आसुरी शक्तींचा नाश करणारी देवी कालरात्री; महासप्तमीला 'अशी' करा देवीची पूजा, मनातील इच्छा होतील पूर्ण
Rupali Chakankar: सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
Model Chaiwali Viral: डॉली चायवाल्याला 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चायवाल्याला 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget