(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2021 Player Retention List: IPL 2021 Player Retention List: चेन्नई सुपरकिंग्जमध्ये मोठे बदल होणार? 'हे' स्टार खेळाडू जाणार
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहचा चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा प्रवास संपुष्टात आला आहे. हरभजन सिंहने स्वत: सीएसके बरोबरचा करार संपल्याची माहिती दिली आहे.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनला रिटेन केलं आहे. इम्नान ताहिर, फाफ ड्यु प्लेसिस, ड्वेन ब्रावो हे खेळाडू देखील चेन्नई संघात कायम असणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केदार जाधव, मुरली विजय, पियुष चावला, शेन वॉटसन यांचा चेन्नई सोबतचा प्रवास संपुष्टात येणार आहे. शेन वॉटसनने आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आयपीएल 2021 च्या लिलावाआधी कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज करु शकतो.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिसला रिलीज करण्याची शक्यता आहे. तर पार्थिव पटेलने यापूर्वीच निवृत्त जाहीर केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स दिनेश कार्तिक आणि टॉम बँटनला रिलीज करू शकतो. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब ख्रिस गेल, करुण नायर आणि शेल्डन कॉटरलला रिलीज करू शकतो. दिल्ली कॅपिटल्स मार्कस स्टॉयनिसला रिटेन करु शकतो आणि शिमरन हेटमीयरला रिलीज करू शकतो.
हरभजन सिंहचा चेन्नईसोबतचा प्रवास संपुष्टात
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहचा चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा प्रवास संपुष्टात आला आहे. हरभजन सिंहने स्वत: सीएसके बरोबरचा करार संपल्याची माहिती दिली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रात जाहीर झालेल्या खेळाडूंची यादी बुधवारी संध्याकाळी जाहीर होणार आहे.
As my contract comes to an end with @ChennaiIPL, playing for this team was a great experience..beautiful memories made &some great friends which I will remember fondly for years to come..Thank you @ChennaiIPL, management, staff and fans for a wonderful 2years.. All the best..????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 20, 2021
हरभजन सिंहने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. हरभजन म्हणाला की, माझा सीएसके बरोबरचा प्रवास संपला आहे. माझ्याकडे सीएसके टीमबरोबरच्या खूप चांगल्या आठवणी आहेत, ज्या आगामी काळात माझ्याबरोबर असतील. सीएसकेच्या व्यवस्थापनाने मला नेहमीच पाठिंबा दिला आणि मी त्यांचा आभारी आहे.