Malinga Retires : लसिथ मलिंगाचा फ्रॅन्चायजी क्रिकेटला अलविदा
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाने फ्रॅन्चायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Malinga Retires : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने फ्रॅन्चायजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाला आगामी मोसमच्या अगोदरच मुंबई इंडियन्सने रिलीज केले होते.
आयपीएल व्यतिरिक्त मलिंगाने जगभरातील अनेक फ्रॅन्चायजी लीगमध्ये सहभाग घेतला होता. मुंबई इंडियन्स शिवाय मलिंगा गॉल ग्लेडियेटर्स, गयाना अॅमेझॉन वॉरियर्स, जमैका तल्लावाह्स, कैंडी, केंट, खुल्ना टाइटन्स, मराठा अरेबियंस, मेलबर्न स्टार्स, मॉन्ट्रियल टायगर्स, नॉनडेस्क्रिप्स क्रिकेट क्लब, पॅलेस डायमंड्स, रंगपूर रायडर्स, रुहुना रेड्स, रुहुना रॉयल्स, सदर्न एक्सप्रेस, सदर्न प्रोविंस और सेंट लूसिया जोक्स या फ्रॅन्चायजीसाठी क्रिकेट खेळला आहे.
आयपीएलमध्ये 122 सामने खेळणार्या लसिथ मलिंगाने 170 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 13 धावा देऊन 5 विकेट ही मलिंगाची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. आयपीएलच्या 2020 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनचा समावेश मलिंगाच्या जागी केला. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता. मुंबई इंडियन्सने आपला मूळ संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यात कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :























