IPL 2020, SRH vs RCB Preview : आज मैदानात भिडणार सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीलच्या हंगामाला सुरुवात झाली असून आज यंदाच्या सीझनमधील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये खेळवण्यात येणार आहे.
IPL 2020 SRH vs RCB, Match Preview : आयपीएल 2020 मधील तिसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघाचा या सीझनमधील हा पहिला सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या संघात डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, राशिद खान, मनीष पांडे, मोहम्मद नबी आणि भुवनेश्वर कुमार यांसारखे खेळाडू आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात विराट कोहली, एबी डिविलियर्स, आरोन फिंच, डेल स्टेन आणि क्रिस मॉरिस यांसारखे खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये तरूण आणि अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुले आज मैदानात दोन्ही संघांमधील थरार अनुभवायला मिळू शकतो.
Weather Report : कसं असू शकतं हवामान?
दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या आयपीएल 2020 च्या तिसऱ्या सामन्यात हवामानाचा कोणताही अडथळा नसेल. दरम्यान, अबूधाबीप्रमाणे येथेही खेळाडूंना भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्याचसोबत येथेही दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.
तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद सज्ज; पाहा कोणासोबत रंगणार सामने?
हैदराबादच्या कर्णधार पदाची जबाबदारी डेविड वार्नरच्या हाती
दोन वर्षांनी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी पुन्हा एकदा डेविड वार्नरकडे सोपावण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. डेविड वॉर्नरला 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणातील विवादांमुळे संघाचं कर्णधार पद गमवावं लागलं होतं. परंतु, गेल्या सीझनमध्ये वॉर्नरने जबरदस्त खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 2016मध्ये वॉर्नर कर्णधार असताना सनरायझर्स हैदराबादने विजेतेपटाचा मान मिळवला होता.
सनरायजर्स हैदराबाद - डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मदार विराटच्या खांद्यावर
आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं नाही. त्यामुळे यंदा संघ आपलं पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. यंदाच्या आयपीएल 2020 मधील हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना असणार आहे. संघातील अनेक दिग्गज खेळाडूंसह विराटसेना मैदानावर उतरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संभाव्य संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - आरोन फिंच, देवदत्त पड्डिकल/पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, उमेश यादव आणि युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या :
आयपीएलमध्ये आतापर्यंत कधी-कधी झाल्या सुपरओव्हर, काय सांगतो इतिहास? जाणून घ्या