(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएलमध्ये आतापर्यंत कधी-कधी झाल्या सुपरओव्हर, काय सांगतो इतिहास? जाणून घ्या
आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. आयपीएलच्या इतिहासात आतपर्यंत 10 वेळा सुपरओव्हरमधून सामन्याचा निकाल लागला आहे.
IPL 2020 : आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपरओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात केली. गेल्या वर्षीप्रमाणेच या वेळीही कागिसो रबाडा सुपरओव्हरचा हिरो ठरला. आयपीएलच्या इतिहासात आतपर्यंत 10 वेळा सुपरओव्हरमधून सामन्याचा निकाल लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात काल झालेल्या सुपरओव्हरमध्ये पंजाबने 2 धावा बनवून लाजिरवाणे रेकॉर्ड बनवले आहे. तर कागिसो रबाडा सुपरओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.
आयपीलमधील आतापरर्यंतच्या सुपरओव्हर
2009: युसूफ पठानच्या स्फोटक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइटराइडर्सला हरवलं.
2010: धोनीशिवाय मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभव
2013: सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 5 धावांनी पराभव
2013: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय
2014: कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव
2015: किंग्ज इलेव्हन पंजाबकडून राजस्थान रॉयल्सचा पराभव
2016: गुजरात लायन्सचा मुंबई इंडियन्सकडून पराभव
2019: दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय
2019: मुंबई इंडियन्सकडूनकडून सनरायझर्स हैदराबादचा पराभव
अशी होता आयपीएल 2020 मधील पहिली सुपरओव्हर
आयपीएलच्या 13 व्या सीजनच्या दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहज मात केली. विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कगिसो रबाडाने सुपरओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देत 2 बळी घेतले. नंतर ऋषभ पंतने विजयासाठी दिलेलं आव्हान सहज पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पंजाबकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मयंक अगरवालला सुपरओव्हरमध्ये न उतरवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुबईच्या मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक मारा करत पंजाबला 157 धावांत रोखलं आणि सामना रसामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला. त्याआधी मयंक अगरवालने धडाकेबाज खेळी करत 59 चेंडूत 89 धावा केल्या. मात्र पंजाबला विजय मिळवून देऊ न शकल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. मार्क्स स्टॉयनिसने आणि कागिसो रबाडा दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.