IPL 2020 : आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम कॅच; मनीष पांडेच्या 'सुपरकॅच'चा व्हिडीओ व्हायरल
IPL 2020 : रविवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यातही राशिद खान आणि मनीष पांडे यांच्या उत्तम फिल्डिंगचं उदाहरण पाहायला मिळालं. मनीष पांडेने या सामन्यात डाइव्ह मारत एक कॅच घेतला, तर राशिद खानने स्वतःच टाकलेल्या चेंडूंवर कॅच पकडला.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अनेक सामन्यांत खेळाडूंनी घेतलेले अनेक शानदार कॅच घेतले आहेत. रविवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या सामन्यातही राशिद खान आणि मनीष पांडे यांच्या उत्तम फिल्डिंगचं उदाहरण पाहायला मिळालं. मनीष पांडेने या सामन्यात डाइव्ह मारत एक कॅच घेतला, तर राशिद खानने स्वतःच टाकलेल्या चेंडूंवर कॅच पकडला.
राशिद खानने 14व्या ओव्हरमध्ये डी कॉक आपल्या चेंडूंवर बाद केलं. डी कॉकने राशिद खानने टाकलेल्या चेंडूवर षटकार फटकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटवर व्यवस्थित लागला नाही. राशिदने मीड विकेटपर्यंत पळत जाऊन डी कॉकने फटकावलेल्या चेंडूचा कॅच पकडत त्याला बाद केलं. राशिद खानने घेतलेल्या या कॅचमुळे अनेकांना 1983च्या वर्ल्डकपचीही आठवण काढली. कपिल देव यांनी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्सला असचं बाद केलं होतं.
ICYMI - Catch marvel: SuperMan-ish 😱😱😱
He saw, he flew, he caught - Take a bow @im_manishpandey. That was a stunning catch. Right on the list of best so far in the tournament. WATCH - https://t.co/byrZOMe9lX #Dream11IPL pic.twitter.com/c4B79TmXID — IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
राशिदने डी कॉकचा विकेट घेतल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये मनीष पांडेने ईशान किशनने फटकावलेल्या चेंडूवर कॅच पकडत माघारी पाठवलं. मनीष पांडेने 15व्या ओव्हरमध्ये संदीप शर्माने टाकलेल्या चेंडूंवर ईशान किशनचा लॉन्ग ऑनवर डाइव्ह मारत कॅच पकडला. मनीष पांडेने पकडलेला कॅच आयपीएलच्या या सीझनमधील सर्वात अप्रतिम कॅच असल्याचं बोललं जात आहे.
WATCH - Safe hands Rashid. Up high in the air, calls for it and takes it with success. Safe pair of hands from Rashid.https://t.co/qBm4EnGbRZ #Dream11IPL #MIvSRH pic.twitter.com/umj7b1Patm
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
हैदराबादचा यंदाच्या सीझनमधील तिसरा पराभव
मनीष पांडे आणि राशिद खानच्या अप्रतिम फिल्डिंगनंतरही हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईने हैदराबादसमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. परंतु, हैदराबादच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावत 174 धावा काढल्या. मनीष पांडेने 19 चेंडूंमध्ये 30 धावा काढल्या. दरम्यान, हैदराबादच्या संघाने आतापर्यंत पाचपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला असून तीन सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :